*करकंब येथील बीएसएफचा जवान चंद्रकांत उर्फ बाळासाहेब माळी यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*

करकंब:/-प्रतिनिधी
करकंब ता पंढरपूर येथील बीएसएफ सेवेत कार्यरत असलेले जवान चंद्रकांत(बाळासाहेब) माळी वय 56 वर्षे यांचे पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर करकंब येथे शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.
करकब येथील चंद्रकांत (बाळासाहेब )माळी हे शेतकरी कुटुंबात जन्मलेले होते. परंतु देशसेवेच्या वेडाने झपाटलेले चंद्रकांत उर्फबाळासाहेब यांनी 1985 मध्ये बीएसएफ मध्ये कॉनसटेबल पदावर देश सेवेत रुजू झाले. त्यांनी बीएसएफ सेवेत काम करताना सब इंस्पेक्टर पदापर्यंत मजल मारली. त्यांनी देशाच्या विविध भागात 37 वर्षे सेवा बजावली पंजाब येथिल 183 बटालियन येथे सेवा बजावत असताना मागील 1 महिन्यापूर्वी अचानक खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पंजाब येथून पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले .त्यांच्यावर रुग्णालयात हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती परंतु उपचार घेत असताना आज सकाळी त्यांची हृदय विकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली त्यांच्यावर करकंब येथील पंढरपूर टेंभुर्णी रोड वरील त्यांच्या शेतात शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे
~~~~~~~~~~~
ग्रामपंचायतीने कडून मानवंदनेची व्यवस्था
जवान चंद्रकांत उर्फ बाळासाहेब माळी यांचे उपचार घेत असताना निधन झाले. त्यांच्या अंत्यविधी त्यांच्या शेतात करण्यात आला .मानवंदना देण्यासाठी जागेची जेसीबीच्या माध्यमातून साफसफाई करून चबुतरा बांधून त्याला फुलांनी
सजविले होते. शिवाय जय जवान तुझे सलाम चे डिझिटल लावून अंत्यविधीची सर्व व्यवस्था ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु व पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे,पो.ह.आर.आर
जाधव. पो.ह. विजय गोरवे सहकाऱ्यांनी मानवंदना दिली. तसेच यावेळी वीर जवान चंद्रकांत उर्फ बाळासाहेब माळी यांच्या पार्थिवावर करकंब ग्रामपंचायत च्या वतीने उपसरपंच आदिनाथ देशमुख , प्राध्यापक सतीश देशमुख माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू अण्णा व्यवहारे, एडवोकेट शरद चंद्र पांढरे सचिन शिंदे तसेच विरोधी पक्षनेते राहुल काका पुरवत माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नगरकर बापू शिंदे मुस्तफा बागवान सतीश माने आदींनी पुष्पहार अर्पण केले.