*करकंब कागदपत्रे फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी महा ई सेवा चालक समाधान गुंड यास अटक* : *तीन दिवसांची पोलीस कोठडी* 

*करकंब कागदपत्रे फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी महा ई सेवा चालक समाधान गुंड यास अटक* : *तीन दिवसांची पोलीस कोठडी* 

करकंब /प्रतिनिधी

करकंब येथील किराणा दुकानदारास बोगस परवाना दिल्याबद्दल गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी समाधान गुंड यास करकंब येथे  अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 याबाबत माहिती अशी की,करकंब येथील किराणा दुकानदार स्वप्नाली राजू शिरसकर यांचे आदिक किराणा हे दुकान आहे. शिरसकर यांनी करकंब येथील महा ई सेवा चालक समाधान गुंड याचेकडे आवश्यक कागदपत्रे दिली होती परंतू गुंड याने परवाना ऑनलाइन न करता बोगस परवाना तयार करून दिला अशाप्रकारची तक्रार अन्न व सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी करकंब पोलीसस्टेशन येथे 26 मार्च 2021 रोजी दिली होती. त्यानंतर समाधान गुंड याचेवर भा द वी  419, 420, 466, 468, 471, 474, 475 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
गुन्हा दाखल झाल्यापासून गुंड हा फरारी होता. सदर अरोपिस करकंब पोलीसानी अखेर सपोनि प्रशांत पाटील   यांचे मार्गदर्शखाली  अटक करून न्यायालया पुढे उभे केले असता अरोपिस तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक महेश मुंढे हे करित आहेत.