*संकटग्रस्तास नेहमीच साथ देणाऱ्या समाजसेवक संजयबाबा ननवरे यांनी केली आजारी कलाकारासही मदत* ...

पंढरपूर /प्रतिनिधी
गरजू आणि संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पंढरीतील समाजसेवक संजय ननवरे यांची ख्याती पंढरी नगरीत पसरली आहे. यामुळेच अनेक संकटग्रस्त त्यांच्याकडे आवर्जून मदतीची मागणी करतात. अशाच एका मूर्तिकार आणि रंगकाम करून जगणाऱ्या कलाकारास त्यांनी मदतीचा हात दिला आहे. संजय ननवरे यांच्याकडून देण्यात आलेल्या या मदतीने हा कलाकार भारावून गेला आहे.
पंढरपूर शहरातील व्यंकटेश वनारे हा रंगकाम करणारा कलाकार, काही दिवसापासून पोटाच्या व्याधीमुळे अडचणीत होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. एक महिन्यापासून काम करता येत नसल्यामुळे, त्याचे कुटुंबही अडचणीत आले होते. श्री महालक्ष्मी गणपती यांच्यासह विविध महामानवांच्या मूर्ती बनवून रंगकाम करण्याचे काम तो नेहमी करीत होता. परंतु ऐन सणासुदीच्या काळात व्याधीमुळे त्याचे काम थांबले.
कुटुंबात दोन मुली आणि एक लहान मुलगा असल्याने घरात कमावतेही दुसरे कोण नसल्यामुळे, त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले. मध्यमवर्गीय असल्यामुळे कोणाकडे हातही पसरता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांनी आपली अडचण अफजल सय्यद या शेजारी मित्रास सांगितली. त्यांनी तात्काळ संजय ननवरे यांच्याशी संपर्क साधला. तात्काळ होकार देत संजय ननवरे यांनी, दोन महिने पुरेल एवढा किराणा माल आणि धान्य, व्यंकटेश ननवरे यांच्या घरी पोहोच केले. यावेळी व्यंकटेश वनारे यांनी बनवलेल्या श्री महालक्ष्मीच्या मूर्ती पाहून, संजय ननवरे यांनी त्यांचे कौतुकही केले. यावेळी व्यंकटेश वनारे यांनी संजय ननवरे यांचे आभार मानले.