*पंढरपूर तहसीलमध्ये उभारली पाणपोई .....*   *घशाची कोरड थांबली .....* *दस्तलेखनिक सुधीर उर्फ तात्या महाराज साळुंखे  यांचा पुढाकार .*..

*पंढरपूर तहसीलमध्ये उभारली पाणपोई .....*   *घशाची कोरड थांबली .....*  *दस्तलेखनिक सुधीर उर्फ तात्या महाराज साळुंखे  यांचा पुढाकार .*..

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर तहसील कार्यालयात हेलपाटे मारणाऱ्या हजारो नागरिकांच्या घशाला पडलेली अनेक वर्षांपासूनची कोरड, अखेर शमली आहे. या ठिकाणी पिण्याच्या शुद्ध आणि थंडगार पाण्याची पाणपोई सुरू करून, येथील दस्तलेखनिक सुधीर उर्फ तात्या साळुंखे यांनी येथे येणाऱ्या नागरिकांची गरज भागवली आहे. चार दिवसापूर्वी या शानदार पाणपोईचे थाटात उदघाटन करण्यात आले.


पंढरपूरच्या तहसील कार्यालयात उभारण्यात आलेली ही पाणपोई,  कै. मेजर सुरेश एकनाथ साळुंखे यांच्या नावे उघडण्यात आली असून , या पाणपोईने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंढरपूर तालुका हा सधन आणि बागायती तालुका आहे. साखर कारखानदारी आणि सहकारामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते . सहाजिकच तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या या ठिकाणी आहे . असे असताना आजतागायत या आवारात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय अस्तित्वात नव्हती . तहान लागल्यास गेटसमोरील दुकानातून
वीस रुपये मोजून पाण्याची बाटली खरेदी करावी लागत होती. ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा हा भुर्दंड मना विरोधात सहन करावा लागत होता, परंतु याकडे कोणाचेही लक्ष नव्हते.
मध्यंतरीच्या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने या ठिकाणी पानपोई उभा केली होती. परंतु ही पाणपोई फक्त उद्घाटना दिवशीच नागरिकांना पाणी देऊ शकली . नंतरच्या दिवसापासून कोरडी ठणठणीत राहिली , आणि कित्येक वर्षानंतर मंदिर समितीने केलेला प्रयोग फसला गेला.

सध्याचे तहसीलदार सुशील बेल्हेकर हे मागील काही दिवसात पंढरपूरमध्ये रुजू झाले , आणि या ठिकाणची अवस्था बदलण्यास सुरुवात झाली . तहशिल आवार चकाचक करण्यात आले. इमारतींना रंगरंगोटी , वृक्ष लागवड, झाडाच्या कुंड्या आदींनी हा परिसर सुशोभित झाला . आता पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची निकड भासू लागली . पंढरपूर तहसील आवारातील गेल्या तीन पिढ्यांपासून दस्त लेखनिक पदाचे काम करणारे साळुंखे कुटुंबाने यामध्ये पुढाकार घेतला. सुधीर( तात्या महाराज) सुरेश साळुंखे यांनी स्वखर्चाने ही पाणपोई उभी केली. कै. मेजर सुरेश एकनाथ साळुंखे यांच्या नावे पाणपोई उभा करण्यात आली . या पाणपोईमध्ये दररोज सकाळी १ हजार लिटर शुद्ध आणि थंड केलेले मिनरल वॉटर भरले जात आहे . अनेक वर्षापासून कित्येक नागरिकांची पिण्याच्या पाण्याची निकड , या पानपोईने पूर्ण केल्याचे समाधान आपणास लाभत असल्याची प्रतिक्रिया सुधीर साळुंखे यांच्याकडून देण्यात येत आहे.

चौकट

पंढरपूर तहसीलमध्ये पिण्याच्या पाण्याचा शोध घेणारे नागरिक पाहून , आपण पूर्वीपासूनच पिण्याचे थंडगार जार ठेवून सोय करत होतो. परंतु कालांतराने दररोज दहा ते पंधरा जारही कमी पडू लागले , आणि ही सोय करण्यासाठी खर्च वाढतच गेला. सध्याचे तहसीलदार बेल्हेकर साहेब यांनी हा परिसर सुशोभित केला, आणि मागील तीन पिढ्यापासून दस्त लेखनिक म्हणून काम करणारे आमचे साळुंखे कुटुंबीय,नागरिकांचे काही देणे लागतो, या भावनेने पाणपोई उभारण्याची कल्पना मनात आली.  मनातील ही कल्पना बेल्हेकर साहेबांच्या सहकार्याने प्रत्यक्षात आली -   सुधीर साळुंखे