*करकंब चौकातील डिजीटल फलक बनले धोकादायक.*..।

करकंब/ प्रतिनिधी –
नगर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गालगत व पंढरपूर करकंब जाणाऱ्या मार्गालगत डिजीटल फलकांचा विळखा लागल्याने या मार्गावरुन जाणाऱ्या व येणाऱ्या वाहन धारकांना मोठया अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच हे डिजीटल फलक राष्ट्रीय महामार्ग करकंब पंढरपूर राज्य मार्ग या मधोमध लावल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे डिजीटल फलक अत्यंत धोकादायक झाले असून याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सार्वजनिक बांधकाम, ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.
या राष्ट्रिय महामार्गावरुन दररोज मोठया प्रमाणात अवजड वाहने शेतीमाल वाहतूक आसपासच्या गावातील, खेडयापाड्यातील, वाडया वस्त्यातील दिवसरात्र वाहतूक सुरु असते. करकंब गावातील करकंब चौक हा महत्वाचा भाग असून याच ठिकाणहून वाहनाच्या मोठया प्रमाणात वर्दळ असल्या कारणाने गावात जाणारी वाहने व राष्ट्रिय महामार्गावरुन जाणारी वाहने त्यातच अनाधिकृतपणे डिजीटल फलकामुळे मोठया प्रमाणात अपघातास निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे सदरचे डिजीटल फलक संबंधितांनी त्वरित हटवावेत अशी वाहन धारक, ग्रामस्थ परिसरातून मागणी होत आहे.