*पंढरपूरच्या विकासाच्या सर्व बैठका पंढरपुरात घ्याव्यात अन्यथा आंदोलन.-:मनसे नेते दिलीप धोत्रे*
पंढरपूर/प्रतिनीधी
वाराणसीच्या धरतीवर तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास करण्यात येणार आहे याबाबत चर्चा करण्यासाठी प्रशासनाने सोलापूर येथे 12 सप्टेंबर रोजी बैठक बोलावली आहे ही बैठक वास्तविक पाहता पंढरपूरला घेणे गरजेचे आहे. अन्यथा मनसे च्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे
पंढरपूर हे राज्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र असून पंढरपूर मध्ये येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी शासन कोट्यावधी रुपयाचा खर्च करते मात्र हा निधी भाविकांच्या सुविधेसाठी खर्च न करता पुढाऱ्यांच्या सोयीप्रमाणेच खर्च केला जातो
1982 झाले झालेल्या रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या नागरिकांना गेली 40 वर्षे झाले सुविधा आणि राहण्यासाठी घरे मिळाले नाहीत हे राजकीय षडयंत्र त्या काळातील लोकप्रतिनिधीं व अधिकारी यांची उदासीन भूमिका कारणीभूत आहे
जो वाराणसीच्या धरतीवर पंढरपूरमध्ये विकास करायचा आहे तो नागरिकांना विश्वासात घेऊनच करणे गरजेचे आहे .पंढरपूरचा विकास आणि सोलापूरला बैठक हे चुकीचे आहे .यामुळे पंढरपुरातील नागरिक व्यापारी भयभीत झाला आहे
पुन्हा रस्ता रुंदीकरणाची टांगती तलवार असल्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने ही बैठक पंढरपूरला घ्यावी अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या बैठकीत महाराज मंडळी, नागरिक, व्यापारी विविध पक्षाचे नेते स्थानिक नागरिक व्यापाऱ्यांचे मते जाणून घेणे गरजेचे आहे
याचा विचार करण्यात यावा अन्यथा मनसे च्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे..... .
वाराणसीच्या धरतीवर तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास करण्यात येणार आहे याबाबत चर्चा करण्यासाठी प्रशासनाने सोलापूर येथे 12 सप्टेंबर रोजी बैठक बोलावली आहे ही बैठक वास्तविक पाहता पंढरपूरला घेणे गरजेचे आहे. अन्यथा मनसे च्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे .
पंढरपूर हे राज्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र असून पंढरपूर मध्ये येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी शासन कोट्यावधी रुपयाचा खर्च करते मात्र हा निधी भाविकांच्या सुविधेसाठी खर्च न करता पुढाऱ्यांच्या सोयीप्रमाणेच खर्च केला जातो.
1982 झाले झालेल्या रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या नागरिकांना गेली 40 वर्षे झाले सुविधा आणि राहण्यासाठी घरे मिळाले नाहीत हे राजकीय षडयंत्र त्या काळातील लोकप्रतिनिधीं व अधिकारी यांची उदासीन भूमिका कारणीभूत आहे.
जो वाराणसीच्या धरतीवर पंढरपूरमध्ये विकास करायचा आहे तो नागरिकांना विश्वासात घेऊनच करणे गरजेचे आहे .पंढरपूरचा विकास आणि सोलापूरला बैठक हे चुकीचे आहे .यामुळे पंढरपुरातील नागरिक व्यापारी भयभीत झाला आहे.
पुन्हा रस्ता रुंदीकरणाची टांगती तलवार असल्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने ही बैठक पंढरपूरला घ्यावी अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या बैठकीत महाराज मंडळी, नागरिक, व्यापारी विविध पक्षाचे नेते स्थानिक नागरिक व्यापाऱ्यांचे मते जाणून घेणे गरजेचे आहे .
याचा विचार करण्यात यावा अन्यथा मनसे च्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.