*करकंब पोलीस ठाणे व विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना नंबर 2 करकंब च्या वतीने ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याची मोहीम* *करकंब पोलीस ठाण्याचे वतीने अपघात टाळण्यासाठी उचलले पाऊल*

*करकंब पोलीस ठाणे व विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना नंबर 2 करकंब च्या वतीने ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याची मोहीम*   *करकंब पोलीस ठाण्याचे वतीने अपघात टाळण्यासाठी उचलले पाऊल*

करकंब /प्रतिनिधी:

सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या सूचनेप्रमाणे करकंब पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू , पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांनी करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत वाहतूक व अपघात पथक तसेच करकंब येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 2 यांच्या समन्वयाने मोठे अपघात होऊ नये यासाठी करकंब पोलीस ठाणे अंतर्गत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याची मोहीम राबवून लहान-मोठे अपघात होऊ नये यासाठी पाऊल उचलले आहे. सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. ऊसाने भरलेली वाहने रात्रीच्या वेळेस रस्त्याने वाहतूक करतात. अशा वाहनांना रात्रीच्या वेळेस वाहतूक करताना पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्यामुळे मोठे अपघातही घडतात. त्यामुळे करकंब पोलीस स्टेशन व विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट नंबर 2 यांच्या माध्यमातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याची मोहीम आजपासून सुरू केली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी सांगितले.
या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनास रिप्लेक्टर बसवताना करकंब पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु, पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 2 चे जनरल मॅनेजर सुहास यादव, केन मॅनेजर संभाजी थिटे मुख्य शेतकी अधिकारी बाबुराव इंगवले, सुपरवायझर महादेव गायकवाड, अपघात पथकाचे प्रमुख पोलीस नाईक उमेश जाडकर दीपक लेंगरे संतोष गायकवाड तसेच वाहतूक शाखेचे पोलीस नाईक इनामदार पोलीस हवालदार विजय गोरवे आणि ऊस वाहतूक वाहन चालक उपस्थित होते.