*आज करकंब येथे जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते होणार उदघाटन.....!* *- ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार अत्यावश्यक व जलद सेवा-सुविधा*

*आज करकंब येथे जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते होणार उदघाटन.....!* *- ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार अत्यावश्यक व जलद सेवा-सुविधा*

करकंब/प्रतिनिधी
 
      करकंब ता पंढरपूर येथील जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा उदघाटन समारंभ आज शनिवार दि 15 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता शंकर नगर करकंब येथे देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.छत्रपती संभाजीराजे,संस्थापक स्वराज्य संघटना,महाराष्ट्र राज्य हे असणार आहेत.


     ग्रामीण भागातील रुगांना मुंबई, पुणे,सोलापूर, अकलूज, हैद्राबाद, पंढरपूर अशा विविध ठिकाणी विविध आजाराच्या उपचारासाठी जावे लागते परंतु आता करकंब येथे डॉ पांडुरंग जगतात व डॉ आरती जगतात यांनी ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी त्यांची होणारी हेळसांड पाहून करकंब सारख्या ग्रामीण भागात सर्व सोई-सुविधांयुक्त जे पुणे,मुंबई येथे उपचार मिळतात त्याच प्रमाणे या जगताप सुपर स्पेशेलिटी अद्ययावत वैद्यकीय यंत्रणा कार्यरत केली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा आर्थिक खर्चा बरोबर वेळेचा खर्च ही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.त्याचबरोबर रूग्णांना ही चांगल्या प्रकारच्या सेवा व उपचार मिळणार आहेत.

 यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे,खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर,माजी आ.दत्तामामा भरणे,आ.बबनदादा शिंदे,आ.सुभाष देशमुख, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.संजयमामा शिंदे,आ.रोहितदादा पवार,आ.यशवंत माने,आ.शहाजीबापू पाटील,आ.राम सातपुते, मा.आ.प्रशांत परिचारक,हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय सावंत,राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे यांच्यासह विठ्ठलचे चेअरमन अभिजित आबा पाटील,सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे,भगीरथ भालके,धैर्यशील मोहिते-पाटील, शहाजी पवार,बळीरामकाका साठे,उमेश पाटील,संजय कोकाटे,संभाजीराजे शिंदे,रणजितसिंह शिंदे,डॉ.बी.पी.रोंगे सर,सचिन जगताप,राजाभाऊ सरवदे,ऍड.गणेश पाटील,नागेश भोसले, दिलीपबापू धोत्रे,शरद कोळी,युवराज पाटील, प्रा.शिवाजीराव काळूगे,डॉ.अमरजीत गोडसे,प्रा.कैलास खुळे, प्रभाकरभैय्या देशमुख, विजयराज डोंगरे,शिवाजी नाना कांबळे, भारतआबा शिंदे,सुभाष माने सर,दीपक पवार,संतोष नेहतराव, दीपक वाडदेकर,किरणराज घाडगे,महेश नाना साठे,सचिन पाटील,तानाजी बागल, राजकुमारनाना पाटील,अजय जाधव,अमरजीत पाटील,प्रा.महादेव तळेकर, बाळासाहेब माळी, अतुल खरात, कृष्णात माळी, शहाजहान शेख,नितीन खटके, भाऊसाहेब अंबुरे,दिनकर कवडे, बाळासाहेब देशमुख, आदिनाथ देशमुख, शरदचंद्र पांढरे,राहुलकाका पुरवत,अमोलदादा शेळके,अजितसिंह देशमुख, प्रा.तुकाराम मस्के आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

     जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.पांडुरंग जगताप व डॉ.सौ.आरती जगताप यांनी सांगितले.तरी या उदघाटन सोहळ्यास करकंब आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान जगताप परिवाराने केले आहे.