*लक्ष्मी टाकळी उपनगरातील विविध रस्त्यांचे भूमिपूजन* *जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे यांच्या फंडातून होणार रस्ते*

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर शहरालगतअसलेल्या मौजे लक्ष्मी टाकळी भागातील उपनगर परिसर येथील विविध रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य, शिवसेना सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या फंडातून विविध रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांचे भूमिपूजन साठे बंधू यांच्या हस्ते करण्यात आले.
या परिसरातील प्रतिभाताई परिचारक नगरमधील शिंदे सर गल्ली ,अकबर आतार व सर्व गोड गल्ली , कड्डी सर विटकर गल्ली या भागातील काँक्रिटीकरण व खडीकरणासाठी दहा लाख रुपये देण्यात आलेआहेत.या कामाचे भूमिपूजन महेशनाना साठे यांच्या माध्यमातून करण्यात आले. या भूमिपूजन प्रसंगी लक्ष्मी टाकळी गावचे सरपंच संजय साठे, ग्रा .स. त्यांच्या मातोश्री सौ नागरबाई साठे, ग्रा.स. त्यांच्या वहिनी सौ रेश्मा साठे, ग्र .स .त्यांच्या पत्नी सौ रोहिणी साठे, ग्रा स सागर सोनवणे, सागर कारंडे ,शिंदे सर, कुलकर्णी काका, जाधव सर, कड्डी सर, शिंदे मॅडम, हुसेन तांबोळी ,देवल साहेब, ननवरे साहेब, अकबर आतार, राजू शेख, विटकर, कोकाटे साहेब, नितीन खडतरे, सौरभ नाटिळक,आसबे सर, औदुंबर पोतदार, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महेश नाना आपल्या मनोगत आतून म्हणाले की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मुळे मला जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी संधी मिळाली त्यामुळे मी पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या विकास कामांना निधीच्या स्वरूपात अंशतः न्याय देऊ शकलो. येणाऱ्या काळामध्ये देखील जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसं या संधीचं सोनं करता येईल यावर भर दिला जाईल. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू म्हणून महेश साठे यांच्याकडे पाहिले जाते.त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा येथील नागरिकांकडून महेश नानासाठे यांच्या बद्दल अपेक्षा वाढत आहेत.