विठ्ठल कारखाण्याची उसबिले त्वरित द्या! -शेखरभाऊ भोसले.

विठ्ठल कारखाण्याची उसबिले त्वरित द्या! -शेखरभाऊ भोसले.

प्रतिनिधी:  पंढरपूर 
विठ्ठल कारखान्याच्या शेतकऱ्यांची उसाची बिले तात्काळ द्या. गळीत हंगाम पूर्ण होऊन कारखाना बंद होऊन 3 महिने झाले, तरीही अद्याप उसाची बिले दिली नाहीत. शेतकऱ्यांना दवाखान्यासाठी, पावसाळा तोंडावर असल्याने शेतातल्या मशागतीसाठी, उसाच्या खतासाठी पैशाची चणचण आहे. डिझेल-पेट्रोलचे दर, खताचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. म्हणून शेतकऱ्यांच्या हक्काची बिले कोणतीही कारणे न सांगता तात्काळ देण्यात यावीत. 
                   अनेकवेळा चेरमन, व्हाईस चेरमन व संचालक याना बिलाबाबत विचारणा केली असता- "तुम्ही मागणी अर्ज द्या, पन्नास टक्के रक्कम देऊ", अशी थातुरमातुर उत्तरे देत आहेत. आमच्याच उसाचे पैसे देने देय असताना, उपकार करतो अशा थाटात खोटी आश्वासने देत आहेत. "साखर विक्री केल्यावर बिले देतो, व्यापाऱ्याने पैसे दिले नाहीत, शासनाने पैसे दिले नाही, बँका पैसे देत नाहीत" अशी बाष्कळ व बेजबाबदार उत्तरे
 काही संचालक देतात.
                        व्यवस्थापनाला इतकी पारदर्शकतेची चाड व संस्था-सभासद यांबाबत कळकळ असली असती तर यांनी राजीनामे देऊन निवडणूकीला सामोरे जावे, सभासद अकार्यक्षम व्यवस्थापनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. 
                      निम्म्या विद्यमान संचालकांचा कारखान्याच्या चेरमन, व्हाईस चेरमन वर अजिबात विश्वास नाही व स्वतःचा ऊस देखील त्यांनी विठ्ठल कारखान्याला न देता इतर कारखान्यांना दिला आहे. कारखाना प्रशासनामधील शेती अधिकारी अकौंट अधिकारी यांची स्वतःची वाहने इतर कारखान्यांना ऊस वाहतूक करतात. सही मात्र विठ्ठलाच्या हजर पत्रकावर करतात. आपला सभासदांचा हक्काचा विठ्ठल कारखाना मात्र नो-केन होऊन बंद पडतो. व्यवस्थापनाच्या गैरकारभारामुळे या सर्व गोष्टी घडत आल्या आहेत.
            वरील प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून शेतकरी सभासदांची ऊस बिले त्वरित द्या अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची तारीख जाहीर करू.            - शेखरभाऊ भोसले माजी संचालक विठ्ठल सहकारी साखर कारखाना.