*करकंब येथील ऐतिहासिक सोळाव्या शतकातील वेशीवर ही.. तिरंगा ...फडकला....!* *स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना दिला उजाळा.*

*करकंब येथील ऐतिहासिक सोळाव्या शतकातील वेशीवर ही.. तिरंगा ...फडकला....!*  *स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना दिला उजाळा.*


करकंब /प्रतिनिधी :

-आपल्या देशाचे राष्ट्रीय प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वज तिरंगा प्रति त्याचा मान सन्मान जपण्यासाठी अमृत महोत्सवी वर्ष या निमित्ताने हर घर तिरंगा याप्रमाणे करकंब येथे इतिहासाचा प्राचीन ठेवा आणि साक्ष असलेल्या ऐतिहासिक सोळाव्या शतकातील शिवकालीन थोरली वेस या शिवकालीन वेशीवर शिवरत्न तरुण मंडळ व शिवप्रेमी तरुण मंडळ व ग्रामस्थ ,शिवभक्तांच्या उपस्थितीत तिरंगा... फडकला. करकंब हे इतिहासकालीन म्हणून साक्षीदार असलेलं त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यलढ्यात सुपरीचीत असलेलं गाव म्हणून ओळख आहे. करकंब मधील  स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यलढ्यात लढा दिला. जरी आज हे स्वातंत्र्यसैनिक हयात नसले तरी या अमृत महोत्सवी वर्षात यानिमित्ताने अनेकांनी यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
गेल्या दोन दिवसापासून या अमृत महोत्सव वर्षानिमित्त थोरली वेस , छत्रपती शिवाजी चौक येथील शिवरत्न व शिवप्रेमी तरुण मंडळ यांच्या वतीने या शिवकालीन वेशीवर तिरंगा फडकवण्यासाठी प्रचंड परिश्रम घेत होते. सुरुवातीस या राष्ट्रीय ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीताने सुरुवात झाली. यावेळी शिवरत्न व शिवप्रेमी तरुण मंडळ थोरली वेस् छत्रपती शिवाजी चौक, शिवभक्त शिवप्रेमी , मुस्लिम बांधव ,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर प्रथमच या सोळाव्या शतकातल्या इतिहासाची साक्ष असलेल्या वेशीवर तिरंगा ...फडकल्याने अनेकांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवत सामाजिक संदेश या माध्यमातून दिला.