*अपंगाच्या निधीसाठी आजही व भविष्यातही कटिबध्द राहणार :- उपसरपंच आदिनाथ देशमुख* * करकंब येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा* * जागतिक अपंग दिनाला सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांनी मारली दांडी* * मुकमोर्चा व हालगी नादाने दिव्यांगाची जनजागृती*

*अपंगाच्या निधीसाठी आजही व भविष्यातही कटिबध्द राहणार :- उपसरपंच आदिनाथ देशमुख* * करकंब येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा* * जागतिक अपंग दिनाला सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांनी मारली दांडी* * मुकमोर्चा व हालगी नादाने दिव्यांगाची जनजागृती*


करकंब/ प्रतिनिधी –

करकंब ग्रामपंचायतच्या माध्यमातून करकंब येथील ऑनलाईन असलेले सर्व दिव्यांग मुकबधिर, अंध, मतिमंद, कर्नबधिर व शारीरिक विकलांग असलेल्यांसाठी राज्य सरकारने तरतूद केल्याप्रमाणे या सर्व दिव्यांगाना आजही व भविष्यातही त्यांच्या हक्काच्या निधीसाठी कायम कटिबध्द राहणार असून त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना तसेच उपजिविकेसाठी गाळे व साहित्य साधने उपलब्ध करुन देणार असल्याचे मत सोलापूर जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष व विद्यमान उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी व्यक्त केले.
 ते करकंब ग्रामपंचायत कार्यालय येथे जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्त बोलत होते. यावेळी सपोनि निलेश तारु, पोउनि महेश मुंडे, पोहेकॉ नितिन शेटे, प्रा. सतिष देशमुख, जि.प.सदस्य अतुल खरात, ग्रा.पं.सदस्य संतोष धोत्रे, मुस्तफा बागवान, सुरेश शिंदे यांच्या सह बहुसंख्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 
 सुरुवातीस जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाजामध्ये दिव्यांगाबद्दल असलेली जनजागृती निर्माण व्हावी. या उद्देशाने करकंब येथील तलाठी कार्यालय येथून प्रचंड संख्येने हलगी नाद काढून अपंगाच्या असलेल्या निधी, विविध समस्याच्या बाबत मुकमोर्चाने व हालगी नादाने तलाठी कार्यालय ते आतार चौक, एसटी स्टँड, मोडनिंब चौक ते करकंब ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत ही दिव्यांग रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये करकंब शहराध्यक्ष उमेश गोडसे, शाखाध्यक्ष महेंद्र लोढे, संपर्क प्रमुख शरद शिंदे, सचिव बाळू पेठकर, उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, अमोल मोरे, दत्ता धायगुडे, संभाजी खंदारे, सुरेखा भाजीभाकरे, संगीता पलंगे, गायत्री दुधाणे यांच्यासह बहुसंख्य दिव्यांग सहभागी झाले होते. परंतु आजच्या या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त करकंबचे प्रथम नागरिक सरपंच तेजमाला शरदचंद्र पांढरे, कर्तव्यदक्ष असलेले ग्रामविकास अधिकारी डॉ. सतिष चव्हाण तसेच तात्पुरता कार्यभार सांभाळणारे तलाठी शिंदे यांनी मात्र या कार्यक्रमास दांडी मारल्यामुळे अपंगामधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.