*धीरज कदम यांना राज्यस्तरीय युवा प्रताप पुरस्कार प्रदान*

*धीरज कदम यांना राज्यस्तरीय युवा प्रताप पुरस्कार प्रदान*


पंढरपूर /प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील  रोपळे गावचे सुपूत्र व रेडियन्स क्रोपकल्चर इंडस्ट्रीजचे डायरेक्टर धीरज कदम यांना कृषी व सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल युवा प्रताप कृषी व सामाजिक पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले.
उद्योग भारती व कृषी पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने देण्यात येणारा हा पुरस्कार पुण्यातील बालगंर्धव रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये  महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे  अध्यक्ष डॉ. हरिहर कौसडीकर यांच्या हस्ते धीरज कदम यांना देण्यात आला. यावेळी अंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती प्रामाणीकरण अधिकारी व रोमीफ इंडियाचे चेअरमन डॉ. प्रशांत नाईकवडी, के.पी.एस.चे संस्थापक महेश कडूस पाटील, ट्रीनीटी कॉलेजच्या  संचालिका हर्षदा देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
धीरज कदम यांनी विषमुक्त शेती, सेंद्रिय  शेती प्रामाणीकरण, कृषी पर्यटण तसेच  विष मुक्त निविष्ठा निर्मिती व वितरण याबाबत उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या या कार्यामुळे अनेक शेतकर्‍यांना विमुक्त शेती व सेद्रिय शेतीचे महत्व समजले आहे. तसेच त्याचा फायदा शेतकरी वर्गास होत असून त्यातtन त्यांचे जीवनमान उंचावत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या कार्याचे राष्ट्रीय व राज्य स्तरावर कौतुक होत आहे.

चौकट

कृषीसेवेला चालना मिळने गरजेचे
या पुरस्कारामुळे कर्तव्य आणि जबाबदारी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. ते कर्तव्य पार पाडण्यासाठी यापुढील काळात शेतकर्‍यांना विषमुक्त शेती करण्यासाठी जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच सेद्रिय शेतीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. शेतीच्या प्रगतीसाठी होत असलेल्या या बदलाला शेतकर्‍यांनीहि मोठा प्रतिसाद दिला पाहिजे.
*धीरज कदम*
कृषी व पर्यटन जागृती सेवक
रोपळे ता.पंढरपूर