*आता जबाबदारी झटकण्यापेखा,त्याचवेळी राजाराम सावंत प्रमाणे द्यायचा होता संचालक पदाचा राजीनामा* *कर्मवीर आण्णांचे विस्वासु शिलेदार ,संचालक चिंतामणी हाके याचे युवराजदादा पाटील यांना खडे बोल*

पंढरपूर/प्रतिनिधी
मी विठ्ठल कारखान्याचे संस्थापक कर्मवीर औदुंबरआण्णांच्या काळातील संचालक म्हणून काम केले आहे. त्यामुळे मी एक विस्वासु शिलेदार मधीलच एक सच्चा कार्यकर्ता म्हणून पंढरपूर तालुक्यातील राजकारणात काम केले आहे. त्यामुळे आम्हाला सडेतोड बोलायची सवय आहे. त्यामुळे आपण एवढं दिवस संचालक म्हणून राहत असताना सगळं समजल नव्हतं का. पटलं नसत तर आंबे येथील राजाराम सावंत यांच्या प्रमाणे संचालक पदाचा राजीनामा देणे आवश्यक होते., असे खडे बोल युवराजदादा पाटील यांना विठ्ठलचे माजी संचालक चिंतामणी हाके यांनी सुनावले आहेत.
यावेळी पुढे बोलताना हाके म्हणाले की ,तुमी आता भालके यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी निघाला आहे.परंतु ही निवडणूक लढविणे म्हणजे केवळ सभासद आणि कामगार यांचा रोष कमी होणारच नाही. तर या कामगार आणि सभासद यांनी भोगत असलेल्या यातना यामध्ये तुमचाही वाटा आहे, हे नाकारू नका असा टोलाही लगावला आहे.
आम्ही संचालक असताना पाहिले आहे की, कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांच्या समोर खोट नाटे करणाऱ्याचे कोणत्याही प्रकारचे नाटक खपवून घेतले जात नव्हते. त्यामुळे तुमी त्याचे वारसदार म्हणून चुकीच्या गोष्ठी खपवून कशा घेतल्या, असा सवालही माजी संचालक चिंतामणी हाके यांनी युवराजदादा पाटील यांना विचारला आहे.
यापुढील काळात आण्णा प्रमाणेच कारखानदारी चालवून दाखविण्याची धमक केवळ अभिजित पाटील यांच्याकडेच आहे. हे आता तुमी पाठीमागे करून ठेवलेल्या गोंधळवरून दिसून आले आहे. यामुळे आण्णांचे वारसापेक्षाही सभासद आणि कामगारांचे प्रपंच सुधारू शकणारे अभिजीत पाटील यांना या निवडणुकीत आम्ही साथ देणार असल्याचे चिंतामणी हाके यांनी सांगितले आहे.