*भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हा ओबीसी सरचिटणीस पदी संतोष (काका) पिंपळे यांची निवड.* *27 वर्षाची भाजप निष्ठा आली फळाला... सार्थ निवडीमुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव...!
*करकंब /प्रतिनिधी:
-गेली 27 वर्ष भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून व तळागाळातील सामान्य लोकांशी सातत्याने संपर्क ठेवून भारतीय जनता पार्टीच्या असलेल्या धोरण व पक्षाच्या भूमिकेबाबत सातत्याने प्रयत्नशील राहिल्याने 27वर्षाची भाजप निष्ठा आल्याची भावना करकंब व परिसरातून व्यक्त केली जात आहे. सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोलापूर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांनी त्यांची भारतीय जनता पार्टी च्या सोलापूर जिल्हा ओबीसी सरचिटणीस पदाची निवड जाहीर केली असल्याने या सार्थ निवडीमुळे संतोष काका पिंपळे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.*

*निवडीचे पत्र सोलापूर जिल्ह्याचे अभ्यासू मा.आमदार प्रशांत (मालक) परिचारक यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब(दादा) देशमुख, भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस लक्ष्मण(तात्या)वंजारी, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस मनोज पवार ,भारतीय जनता पार्टी करकंब शहराध्यक्ष बंडू (काका)बीके कुलकर्णी ,मेडिकल असोसिएशन तालुका उपअध्यक्ष मिलिंद उकरंडे व संतोष टकले आदी उपस्थित मान्यवर होते*.
*सोलापूर जिल्हा ओबीसी सरचिटणीस निवड झाल्यानंतर संतोष काका पिंपळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यापुढे अजून नव्या जोमाने युवकांशी संवाद साधून ओबीसी तसेच अठरापगड समाजातील लोकांना पूर्वीपेक्षा अधिकच विविध योजनांच्या मार्गाद्वारे मार्गदर्शन करून सर्वसामान्यांचे भविष्य उज्वल करण्याचे काम एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच करणार असल्याचे सांगितले .*