*करकंब येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती भक्तिमय व धार्मिक कार्यक्रमांनी साजरी...!* *करकंब येथे विविध ठिकाणी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन.*

..
करकंब /प्रतिनिधी :
-येथील गुरु रोहिदास प्रतिष्ठान च्या वतीने परमज्ञानी ..संत शिरोमणी, सामाजिक परिवर्तनाचे महानायक- श्री संत रोहिदास महाराज यांची ६४६वी जयंती मोठ्या उत्साहाने भक्तिमय वातावरणात आणि धार्मिक कार्यक्रमांनी श्री संत रोहिदास नगर येथे मान्यवर ,समाज बांधव , ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
सुरुवातीस श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या श्री संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम तसेच श्री सद्गुरू भजलिंग महाराज मठ येथील श्री सद्गुरु भजलिंग महाराज महिला भजनी मंडळ यांचे भजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री संत रोहिदास नगर च्या नामफलकाचे पूजन व उद्घाटन-करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक - महेश मुंडे यांचे हस्ते करण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीचे औचित्य साधून पुष्पृष्टी चा कार्यक्रम संपन्न झाला. पुष्पष्टी नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी या जयंती सोहळ्यास माजी सरपंच-मारुती देशमुख, उपसरपंच-आदिनाथ देशमुख, मा.जि प सदस्य सदस्य-बाळासाहेब देशमुख, पंचायत समिती सदस्य-राहुल काका पूरवत, यशवंत शिंदे सर, भारतीय जनता पार्टीचे ओबीसी चे सरचिटणीस-संतोष काका पिंपळे, अमरसिंह चव्हाण,युवा नेते-अभिषेक पूरवत ,भाजपाचे शहराध्यक्ष-बंडू काका कुलकर्णी, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष- संजीव कुमार खडके, सामाजिक कार्यकर्ते-मुस्तफा बागवान, ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे, महेंद्र शिंदे, स्वच्छता जागर टीमचे-पै. औदुंबर कुंभार, रमेश खारे, प्रा- सतीश देशमुख, महेंद्र शिंदे, किरण काळे, मिलिंद देशपांडे, संदीप अभंगराव,सचिन चरपे , गोपाळ कुंभार , नवनाथ कांबळे, ज्ञानेश्वर कुंभार, अयुब मनेरी ,शशिकांत चौगुले आदी मान्यवर , समस्त समाज बांधव, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंती महोत्सव यशस्वी पार करणे कामी गुरु रोहिदास प्रतिष्ठान चे -अध्यक्ष-दिनेश कांबळे, संदीप राजगुरू, प्रवीण शिंदे, अनिल शिंदे, विशाल शिंदे, किशोर शिंदे, तुकाराम शिंदे, समाधान शिंदे, अनिकेत शिंदे ,सर्जेराव शिंदे, सुदर्शन शिंदे, विनायक राजगुरू, एडवोकेट-जालिंदर शिंदे,शिवराज शिंदे ,विजयकुमार शिंदे , सचिन शिंदे, गणेश कदम, रुपेश शिंदे, प्रणव शिंदे, अथर्व शिंदे ,ज्ञानेश्वर शिंदे, अमर शिंदे ,काशिनाथ शिंदे , धनाजी कांबळे,राजेश शिंदे ,अमोल शिंदे ,पप्पू कदम ,निलेश कांबळे, सोमनाथ शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
*ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत रोहिदास जयंती साजरी.*
येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर सरपंच संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व उपसरपंच -आदिनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुरु रोहिदास प्रतिष्ठान चे अध्यक्ष-दिनेश कांबळे, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात श्री संत रोहिदास जयंती साजरी.*
येथील येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपविभागीय अधिकारी - श्री शरद शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते असते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ लिपिक-बिपिन परचंराव,ए.टी. जाधव उपस्थित होते.
*तलाठी कार्यालय येथे श्री संत रोहिदास जयंती साजरी.*
येथील तलाठी कार्यालय येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जी .प.सदस्य-बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य-राहुल काका पूरवत, युवा नेते अभिषेक पुरवत, मा. ग्रामपंचायत सदस्य -महेंद्र शिंदे, चंद्रकांत उंबरदंड अदिसह विविध मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ समाज बांधव उपस्थित होते.