*जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चेअरमन अभिजीत पाटील यांचा पुढाकार* *पालकमंत्री ना. विखे पाटील यांची भेट घेत पंढरपूर मंगळवेढा भागात चारा डेपो सुरू करण्याची केली मागणी*

पंढरपूर/प्रतिनीधी
यंदाच्या वर्षी पावसाच्या कमतरतेमुळे सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे मंगळवेढा, पंढरपूर येथे चारा डेपो सुरू करावेत . अशी मागणी श्री विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी करीत पशुधन वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
याबाबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना समक्ष भेटून वरील मागणीचे निवेदन निवेदन दिले आहे.
या दुष्काळजन्य कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या आपण पाठीशी आहोत.. चाऱ्याअभावी या मुक्या जनावरांचे होणारे हाल थांबविण्यासाठी शासन स्तरावर संबंधिताना आदेश द्यावे असे सांगितले. असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत पालकमंत्री यांनी सकारात्मक चर्चा करून या बाबतीत सरकार लवकरच निर्णय घेईल असे आश्वासन अभिजीत पाटील यांना दिले आहे. यामुळे जनावरांचा चारा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असेही चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.