*करकंब येथील विठ्ठल मंदिरातील अखंड हरीनाम सप्ताहाची उत्साहात  सांगता.....!*

*करकंब येथील विठ्ठल मंदिरातील अखंड हरीनाम सप्ताहाची उत्साहात    सांगता.....!*

करकंब/-प्रतिनिधी:

- गीता जयंती निमित्ताने करकंब येथील श्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह  व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता हभप श्रीकांत आरोळे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
 गुरुवार दि. ८ डिसेंबर पासून हा सोहळा सुरू झाला होता.  व्यासपीठ चालक म्हणून हभप श्रीहरी रामकृष्ण जोशी (बार्डीकर) यांनी काम पाहिले. दररोज सकाळी काकडा,अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, भजन,प्रवचन, हरिपाठ व रात्री ७ ते ९ कीर्तन असा उपक्रम चालू होता. 
  यावेळी हभप गणेश महाराज बर्गे, ओंकार जोशी, अंकुश रणखांबे, गजानन धर्माधिकारी, भगवंत चव्हाण, नाना महाराज कापडणीस, महादेव कानडे यांची कीर्तने झाली. 
  दररोज ३.३० ते ५ या वेळेत हभप श्रीकांत आरोळे महाराज यांचे 'पंढरी महात्म्य' या विषयावर प्रवचन झाले. 
  संपूर्ण गावांत अभंग, भक्तीगीते गात टाळ-मृदुंगच्या तालावर नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. 
हभप श्रीकांत आरोळे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता मोठ्या आनंदाने  झाली.
  यासाठी ओंकार जोशी, हरी जोशी, केदार जोशी, संदीप भोसले, विश्वास जोशी, पंडीत, विजय शेटे, विक्रांत आरकस, वैजिनाथ राऊत,धोंडीराम काशिद, कांतीलाल धायगुडे, परमेश्वर शिंदे, विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश बाबर, गोटीराम बाबर, संजय शिंदे ,संतोष नगरकर, मोरे मेजर, मोहन गुळवे, माऊली पिसे, रामचंद्र अनवते यांच्यासह तुळशी, जळोली, सांगवी, पेहे, भोसे, पांढरे वाडी,गुरसाळे, घोटी, बार्डी, नेमतवाडी, जाधववाडी,करकंब  इ. गावांतील सर्व टाळकरी भक्तांनी मोलाचे सहकार्य दिले.

•भक्तांसाठी औदुंबर खडके, तुकाराम माने, सतिश देशमुख, संदीप भोसले, समाधान अनवते, डाॅ. प्रदीप देशमुख, संतोष लोंढे, कुमार व्यवहारे, विठ्ठल माळी, परमेश्वर शिंदे, सुनिल जगताप, सुरेश बाबर, सोमनाथ गुंड, महादेव देशमुख, लक्ष्मण जाधव, राजाराम गाडे, रामचंद्र कवडे, भारत आरकस, नागन्नाथ खाडे, शंकर डोळे, झाकीर शेख, समाधान माळी, महादेव खपाले, सुखदेव खपाले, राजेंद्र शेटे, सुनिल जाधव, अमर चव्हाण, तानाजी धोत्रे,तानाजी काशिद यांनी  भोजनासाठी व इतर कार्यासाठी विशेष सहकार्य केले.