*अरे....कुठे नेऊन ठेवला एकनाथ महाराज पालखी तळ...!* *एकनाथा.. आता कुठे टेकवू माथा... निवारा नाही.. रस्ते झाले खडतर.. कशी गाऊ गाथा...!!* *संत एकनाथ.. निवृत्तीनाथ पालखी मार्गावर सुविधांचा अभाव....!*

*अरे....कुठे नेऊन ठेवला एकनाथ महाराज पालखी तळ...!*  *एकनाथा.. आता कुठे टेकवू माथा... निवारा नाही.. रस्ते झाले खडतर.. कशी गाऊ गाथा...!!*  *संत एकनाथ.. निवृत्तीनाथ पालखी मार्गावर सुविधांचा अभाव....!*

करकंब /प्रतिनिधी.
        आषाढी एकादशी यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून या आषाढी एकादशी यात्रा  या महा सोहळ्यासाठी राज्यभरातून तसेचं देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यासह भाविक- भक्त येत असतात. पंढरपूर पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या करकंब अशा पावन पुण्यनगरीत अनेक साधुसंतांच्या "पालखी सोहळा", व "दिंडी सोहळा" मुक्कामी असतो. या पालख्यांचा विसावा आषाढी एकादशी यात्रेला जाण्यापूर्वी करकंब येथे असल्याने या दिवसात आषाढीचे स्वरूप निर्माण होत असते. संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, कैकाडी बाबा महाराज, श्री शनेश्वर महाराज, श्री गजानन महाराज, आदि मुख्य पालख्यासह अनेक प्रमुख दिंड्या करकंबमार्गे येतात. या  संतांच्या येणाऱ्या  पालखी मार्गावर  अद्याप संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाच्या सोहळ्याच्या धर्तीवर सोयीसुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून यामुळे या मार्गावरून येणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी या मार्गावरून येणाऱ्या असंख्य वारकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गतवर्षी संत एकनाथ महाराज हा पालखी सोहळा करकंब येथील टिळक चौक येथील नरसिंह मंदिरात मुक्कामी असल्याने या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने वारकरी व महिला भाविकांचा सहभाग असतो. परंतु गेल्या वर्षी हे मंदिर पडण्याच्या अवस्थेत असल्याने धोकेदायक म्हणून पाडण्यात आले होते. आषाढी एकादशी यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असताना एक वर्ष झाले तरी येणाऱ्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळा पालखी तळाची कोणतीच निवाऱ्याची सुव्यवस्था करण्यात आलेली नाही. संत एकनाथ महाराज ,संत निवृत्तीनाथ महाराज या पालखी मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ते दुरावस्थेत आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस साईड पट्ट्या नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे. मोडनिंब चौक ते शंकर नगर पंढरपूरच्या जाणाऱ्या  रस्त्याच्या दोन्ही बाजूस ठेकेदाराने साईड पट्ट्या केल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.दोन्ही बाजूस काटेरी झुडपे अतिक्रमणही वाढल्याने याकडेही शासन - प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून "अरे.. कुठे नेऊन ठेवला एकनाथ महाराज ..पालखी तळ असे म्हणण्याची वेळ आली असून "एकनाथा" आता कुठे टेकू माथा... "निवारा" नाही... रस्ते झाले खडतर.. आता कशी गाणार "गाथा"...! अशी चर्चा ग्रामस्थातून होत आहे.
        अरुंद रस्ते ..रस्त्यावर पडलेले खड्डे... साईड पट्ट्यावर असणारे अतिक्रमण, काटरी झुडपे हे अपघाताला निमंत्रण देत आहेत.
रस्त्यावर दिशादर्शक फलक नाहीत.  गतिरोधकावर क्रॉसिंग रुल्स नाहीत.भोसे पाटी येथील कॅनल वर लोखंडी बॅरिगेट नाहीत.
 अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यातच पालखी मार्गावरील असलेल्या
रस्त्याच्या साईड पट्ट्याला खाजगी कंपनीने रस्ते उखडलेले आहेत. व अंतर्गत वायरिंगचे काम केलेलीआहेत. त्यामुळे अनेक भागात खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे अद्याप न बुजवल्यामुळे मोठ्या अपघातात निमंत्रण मिळत असून या खाजगी कंपन्याने खोदलेले खड्डे हे मृत्यूचे सापळे बनले आहेत. साईड पट्ट्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे लहान मोठे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. ठेकेदार मुजोर झाल्याने बांधकाम विभाग ही याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असून तालुक्याचे "आमदार" "खासदार" "पदाधिकारी" जिल्हाभर मिरवणारे "नेतेमंडळी"यांनाही याकडे बघायला वेळ मिळत नाही.
  शंकर नगर करकंब येथील राष्ट्रीय महामार्गावरील असलेला हायमस्ट गेली वर्ष झाले बंद अवस्थेत आहे. अनेक ठिकाणच्या या पालखी मार्ग वरील  रस्त्यावरील पथ दिवे बंद आहेत. चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे , पथ दिवे बसवणे गरजेचे आहे. 
     गेल्या वर्षी पन्नास टक्केच रक्कम आषाढी यात्रा वारी अनुदान  ग्रामपंचायत खात्यावर जमा झाली मात्र 50% रक्कम मिळालीच नाही.
ग्रामीण भागात सेवा सुविधा देण्यासाठी वारी अनुदानात वाढ करून  विशेषता या मार्गावरून अनेक साधुसंतांच्या मोठ्या प्रमाणात पालखी सोहळा व दिंडी सोहळा  मुक्कामी असतो. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज या पालखी सोहळ्याच्या धर्तीवर अनुदान शासनाने द्यावे.अशी मागणी स्थानिक सरपंच वर्गातून होत आहे.
ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पालखी तळावर असणाऱ्या सेवा सुविधा त्या मार्गावर असणाऱ्या सुविधा प्रमाणे श्री संत एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज गजानन महाराज इतर  200 पालख्या दिंड्या या मार्गाने मार्गस्थ होतअसतात हा रस्ता वारकऱ्यांच्या पायी दिंडी व वाहतुकीने फुललेला असतो. या नियोजित राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.हा नियोजित राष्ट्रीय  महामार्ग-561(अ)असल्याने हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग 561(अ) सुद्धा चार पदरी होणे गरजेचे आहे. याकडे राजकीय नेते मंडळीं विशेषता स्थानिक प्रतिनिधी, "आमदार" आणि "खासदार" यांनी विशेष लक्ष देऊन राज्य शासन व केंद्र सरकारकडे हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग अधिक पणे  चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी व सुकर करण्यासाठी प्रयत्न करून लोकांच्या विशेषता वारकऱ्यांच्या सेवेसाठी लवकर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
याकडे प्रशासनानेही विशेष लक्ष देऊन या पालखी मार्गावर असणाऱ्या गावांना सेवा सुविधा देण्यासाठी व रस्त्यावर असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. अशी मागणी वारकरी वर्ग व ग्रामस्थातून होत आहे.