*पंढरीत भाजपच्या वर्धापन दिनी पाणपोईचे होणार उदघाटन* *संस्थापक विदूल आधटराव यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मित्र ग्रुपचा स्तुत्य उपक्रम*

पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील संस्थापक विदूल आधटराव यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षांपासून सन्मित्र ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. या ग्रुपच्या वतीने वर्षभरात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यातीलच एक भाग म्हणून बुधवार दिनांक६एफ्रिल रोजी भाजपच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वरील ग्रुपच्या वतीने पाणपोईचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक विदूल आधटराव यांनी दिली आहे.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठया प्रमाणात जाणवत आहे. यामुळे ना कुणाच्या जातीसाठी, नाकुण्या धर्मासाठी. ही तर फक्त तहानलेल्या जीवासाठी असे म्हणत भाजपचे युवा मोर्चाचे माजी शहर अध्यक्ष आणिभाजपच्या नेत्या चित्राताई वाघ यांचे निष्ठावन्त समर्थक विदूल आधटराव यांनी हा पणपोईचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे.
या पणपोईचे उदघाटन संतपेठ परिसरातील जोतिर्लिंगचौकात संध्याकाळी सात वाजता करण्यात येणार आहे. हे उदघाटन डॉ सादिक शेख यांच्या हस्ते1करण्यात येणार आहे. यावेळीअध्यक्षस्थानी मेडीकल असो तालुकाध्यक्ष प्रशांत खलिपे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी भैय्या दोषी, कैलास माने,दिनेश गावडे, शिवप्रसाद स्वामी,दीपक राऊत, लखन ननवरे,पिंटू रणपिसे, समाधान शिरगुरु,पप्पू करपे,प्रदीप आधराव,राजन थोरात,विक्रम माळी,इम्रान मणेरी,आदी मान्यवरासह सन्मित्र ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी भाविक भक्त, पक्षी, जनावरे यांच्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या या पणपोईचे उदघाटन समारंभासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सन्मित्र ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.