*शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुका पंढरपूर येथे पाच सेवानिवृत्त शिक्षक यांचा केला सन्मान*

पंढरपूर:-प्रतिनिधी
स्टेट बँक मुख्य शाखा पंढरपूर शाखा व्यवस्थापक व सर्व स्टाफ कर्मचारी यांच्या वतीने कोरोनाची दक्षता घेऊन दिनांक पाच सप्टेंबर 2021 शिक्षक दिन औचित्य साधून आज चार सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी पाच च्या दरम्यान पंढरपूर तालुक्यातील कार्यरत शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक वृंद यांचे प्रतिनिधित्व म्हणून १श्री ग ,णा, गावडे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक संघटना पंढरपूर २श्री भा, शि, शिंदे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख पंढरपूर ३ सु, रा . कुंभार सेवानिवृत्त केंद्रप्रमुख ४ न ,सो ,मोरे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख व ५ मधुकर जा ,सरवदे गुरुजी न, पा, पंढरपूर सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा माननीय व्यवस्थापक एसबीआय पंढरपूर श्री रणधीर कुमार सिंग व संपूर्ण स्टॉप च्या वतीने व कवठेकर निवृत्त व्यवस्थापक अधिकारी यांच्या उत्कृष्ट नियोजनाने शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प, देऊन सन्मानित केले तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना किमान दोन तासांमध्ये पेंन्शन वर कर्ज मंजूर केले जाईल तसेच मॅच्युअल फंड ,हेल्थ इन्शुरन्स काळाची गरज आदी बाबत मार्गदर्शन केले नेहमी शिक्षक वृंद व इतर सर्व खातेदार यांना अधिक सहकार्य राहील याबाबत मार्गदर्शन केले प्रसंगी स्टेट बँकेच्या आवारामध्ये एक आंब्याचे रोप सर्व सत्कार मूर्ती शिक्षक वृंद यांच्यावतीने श्री भा ,शि, शिंदे यांचे हस्ते आभार मानून व्यवस्थापक यांना देण्यात आले मनोगत व्यवस्थापक यांनी मांडले प्रसंगी स्टेट बँक पंढरपुर शाखेतील सर्व स्टाफ उपस्थित होते