*समाजसेवक संजय ननवरे यांना ' महात्मा फुले समाजरत्न ' पुरस्कार प्रदान*

*समाजसेवक संजय ननवरे यांना ' महात्मा फुले समाजरत्न ' पुरस्कार प्रदान*

पंढरपूर /प्रतिनिधी

पंढरपूर शहरातील समाज सेवक संजय ननवरे याना महात्मा फुले समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डी. राज. सर्वगोड, बीपी रोंगे सर, प्रभाकर भैया देशमुख, ॲड. राजेश भादुले, आदींसह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.


पंढरपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महाउत्सव समितीकडून दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक कमावलेल्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव पंढरीत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. जयंती उत्सव समितीने गुरुवारी सायंकाळी पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमात कोरोना काळात समाजासाठी झटलेल्या व्यक्तींना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले. पंढरपूर नगरपरिषदेच्या आशा वर्कर्स यांचाही गौरव करण्यात आला.


पंढरपूर शहरातील समाजसेवक संजय बाबा ननवरे यांना काही दिवसांपूर्वीच समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार हा या समितीकडून दिला जाणारा मोठा पुरस्कार समजला जातो. यंदाचा समाजरत्न पुरस्कार संजय ननवरे यांना देण्यात आला. या उत्सव समितीच्या व्यासपीठावरील माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, डॉ. बी.पी.रोंगे, ॲड. राजेश भादुले यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते, हा पुरस्कार संजय ननवरे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला.


संजय ननवरे हे व्यक्तिमत्व पंढरपूर शहरात गेल्या काही वर्षापासून चांगले परिचित झाले आहे. समाजाप्रती असलेले प्रेम त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. समाजातील गरजू घटकांना वेळीच मदत करण्याच्या त्यांच्या वृत्तीने त्यांना काही दिवसातच कुठून कुठे नेउन ठेवले, याचा प्रत्यय पंढरपूर वासियांना आला आहे. यामुळेच आजवर त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महाउत्सव समितीने त्यांना आज पुन्हा गौरवले आहे.