*करकंब येथील ग्रामदैवत कनकंबा यात्रा महोत्सव उद्यापासून सुरू......!* *सलग पाच दिवस यात्रा महोत्सवाचे आयोजन*

*करकंब येथील ग्रामदैवत कनकंबा यात्रा महोत्सव उद्यापासून सुरू......!*  *सलग पाच दिवस यात्रा महोत्सवाचे आयोजन*

करकंब/ प्रतिनिधी:

-येथील करकंब सह पंचक्रोशीत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कनकंबा माता या ग्रामदेवतेच्या यात्रे ची सुरुवात चैत्र पौर्णिमा अर्थात हनुमान जयंती च्या दिवसापासून सुरू होत असून या यात्रा महोत्सवानिमित्त श्री कनकंबा माता मंदिर (नेमतवाडी चौक) येथे  धार्मिक व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कनक अर्थात सोने अंबा म्हणजे देवी या कनकंबा देवीवरून करकंब हे नाव पडले असल्याची अख्यायिका आजही सांगितली जाते. या श्री कनकंबा यात्रा महोत्सवानिमित्त दिनांक
 16/04/ 2022 रोजी हनुमान जयंती दिवशी पहाटे देवीचा अभिषेक होऊन संध्याकाळी सात वाजता छबिना व पालखी सोहळा वाजत गाजत करकंब नगरीतून निघणार आहे.
दिनांक- 17/04/2022 रोजी नियोजित कार्यक्रम आयोजित केला आहे.
दिनांक -18/04/2022 रोजी दुपारी12 ते 3 वाजेपर्यंत कुस्ती नेमने व दुपारी चार वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार असून
दिनांक -19/04/2022 रोजी मराठमोळा नाद खुळा ऑर्केस्ट्राचे आयोजन केले आहे .तसेच दिनांक -20/04/2022 रोजी पांडुरंग मुळे सह तुकाराम खेडकर मांजरी कर लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन केलेले आहे. अशी माहिती ग्रामदैवत कनकंबा देवी ट्रस्ट चे अध्यक्ष  अमरसिंह देशमुख व उज्जवलसिंह देशमुख यांनी दिली.
तसेच यावेळी पंचकमिटी चे उद्योजक अमोल शेळके ,बाजीराव नाना  खाडे, विलास धनवे (साहेब),  अजित सिंह देशमुख , अशोक सिंह देशमुख ,पांडुरंग शेटे,  राजेंद्र खारे, शिवाजी सलगर, भीमराव मदने , मेहबूब बागवान ,रमेश खारे आदि जण यात्रा महोत्सव संपन्न करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.