*तुंगत येथील जानुबाई बिरोबा यात्रोत्सव उत्साही वातावरणात* *कुस्ती स्पर्धेत नियोजनाचा अभाव, पंच मंडळी स्टेजवरील जागेसाठी उतावीळ*

तुंगत /प्रतिनिधी
पंढरपूर - मोहोळ महामार्गावरील तुंगत येथील जानुबाई देवीचे मंदिर रोषणाईने सजले आहे. जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे. ७ मे १० मे २०२२ या काळात येथे मोठी यात्रा भरत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या श्रध्देने येत आहेत.पंढरपूरपासुन १६ किलोमीटर अंतरावर तुंगत याठिकाणी देवीचं मंदिर आहे. संकटकाळी भक्तांच्या हाकेला धाऊन जाणारी आणि विशेष म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीचा महिमा असल्याची धारणा भाविकांमध्ये आहे.महाराष्ट्राच्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यातील भाविकांची मंदिरात गर्दी होत आहे. पहाटे पासुनच दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात.याठिकाणी येणार्या भाविकांना जानुबाई देवी प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देते. या देवीची विविध रूपे आहेत. तुंगत याठिकाणी असणारी जानुबाई देवी हि नवसाला पावणारी देवी असल्याने जिल्ह्यासह राज्यातुन भाविक दर्शनासाठी याठिकाणी येतात. परंतु नियोजनाच्या अभावाचा फटका परिसरातुन येणार्या भाविकांना बसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
तुंगत तालुका पंढरपूर येथील ग्रामदैवत श्री जानुबाई व बिरोबा यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी दि ७, ८,९ मे रोजी होत आहे यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यामध्ये देवाचा छबिना व सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्या यांचे नियोजन केले असुन दिनांक ७ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ( छबीणा) पालखी मिरवणुक ८ मे रोजी सकाळी १० ते ५ बेदिक गीते , दुपारी १२ वाजता पालखी,
रात्री ८ वाजता लोकनाट्य तमाशा ९ मे रोजी सकाळी १० ते ४ बेदीक गीते, दुपारी ४ वाजता जंगी निकाली कुस्तीचे आयोजन करण्यात असुन यामध्ये स्वप्नील भैया रणदिवे यांचे वतीने एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिकसाठी पैलवान माऊली जमदाडे आणि पैलवान भारत मदने यांच्यामध्ये लढत होणार आहे जि. प. सदस्य सुभाष माने यांचे वतीने द्वितीय पारितोषिकसाठी पैलवान संतोष जगताप आणि पैलवान दत्ता नरळे यांच्यात लढत होणार आहे. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे यांचे वतीने तृतीय पारितोषिक साठी पैलवान सतपाल नागटिळक आणि पैलवान विक्रम भोसले यांच्यात लढत होणार आहे चतुर्थ क्रमांकासाठी अंकुश लामकाने यांचे वतीने पंचवीस हजार एक रुपयांसाठी पैलवान संग्राम काकडे आणि पैलवान तात्या जुमाळे यांच्यात लढत होणार आहे पाचव्या क्रमांकासाठी भुमिअभिलेख उपअधीक्षक जयदीप शितोळे यांचे वतीने पंचेवीस हजार एक रुपयांसाठी पैलवान मिथुन चव्हाण आणि पैलवान अमित कारंडे यांच्यात लढत होणार आहे. तर सहाव्या क्रमांकासाठी अरुण भगवान रणदिवे यांचे वतीने पंधरा हजार रुपयांसाठी पैलवान गणेश बोदरे आणि पैलवान सुरज मगर यांच्यात लढत होणार असून १०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत इनामाचे कुस्ती स्पर्धा दुपारी दोन पासून चार पर्यंत होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली होती कुस्ती स्पर्धा दरम्यान कुस्ती प्रेमींना मोठा त्रास सहन करावा लागला. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता लावण्यखणी कार्यक्रम होणार आहे तर १० मे रोजी सायंकाळी ७ वाजता तुझ्यात जीव रंगला कार्यक्रममाचे आयोजन केले असल्याची माहिती जानुबाई बिरोबा यात्रा कमिटी च्या वतीने देण्यात आली.
चौकट:
नियोजनाचा उडाला फज्जा ?
या यात्रोत्सव कालावधीत यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांचे वतीने येणारे भाविकांसाठी विविध मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कोरोनाच्या पार्श्वभुमिवर दोन वर्ष यात्रा झाली नसल्याने यंदाचे यात्रेसाठि जंगी नियोजन कमिटीच्यावतीने करण्यात आले मात्र आज झालेल्या कुस्ती स्पर्धेत नामांकित मल्लानी सहभाग नोंदिवला असल्याने अपुर्या मैदानामळे कुस्ती प्रेमींची निराशा झाला. पंच मंडळिंनी आपलाचा तोरा मिरविताना नियोजनाची ऐशीh तैशी केल्याचे जाणवले यामुळे परिसरातुन कुस्ती पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांतुन नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
फोटो: जानुबाई आणि बिरोबा देव