*आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी भीमसेनेचे संस्थापक विलास माने राज्यव्यापी दौऱ्यावर* *राज्यातील प्रमुख शहरातील पदाधिकारी यांच्यासमवेत बैठका सुरू*

पंढरपूर/: प्रतिनिधी
युवा भिम सेनचे संस्थापक अध्यक्ष विलास माने यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत आगामी निवडणुकीची दिशा ठरविण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे.
या दौऱ्यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख शहरातील निवडक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करीत स्थानिक आघाडी आणि कोणत्या राजकीय पक्षाशी मिळतेजुळते घ्यायचे याबाबत स्थानिक पदाधिकारी याना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असल्याचे अध्यक्ष विलास माने जाहीर केले आहे.
ही संघटना आंबेडकर चळवळीची असून या संघटनेचे मुख्य केंद्रस्थान पंढरपूर येथे आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी कार्यकर्यांचे संघटन सुरू असून ,यापुढील काळात हेच संघटन अवघ्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे विलास माने यांनी सांगितले.
या राज्यव्यापी दौऱ्यात मंगळवेढा येथे सत्कार मंगळवेढा युवा भिम सेना चे संस्थापक अध्यक्ष विलास माने यांचा मंगळवेढा येथे अखिल भारतीय भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेश सचिव डिके साखरे व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. माने हे संघटना बांधणी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणे करिता मंगळवेढा येथे आले होते .त्यांचा नियोजित कार्यक्रम संपल्यानंतर मंगळवेढा येथील प्रांत कार्यालय समोर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माने म्हणाले की आंबेडकरी चळवळीने बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम करायचे असून आपापसातले मतभेद गट-तट विसरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणे करिता सर्व समाज बांधवांनी सज्ज राहण्याची गरज आहे. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ लोकरे बहुजन क्रांती संघाचे दर्याप्पा कांबळे लखन लांडगे हरिभाऊ माने यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.