*भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार, पार्टीचे आयोजन*

पंढरपूर/प्रतिनिधी
*सांगोला चौक पंढरपूर येथील गौसिया मज्जिद छोटा कबरस्तान या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,मंडळाचे आधारस्तंभ मा.उमेश सर्वगोड यांच्या वतीन इफ्तार पार्टी साजरी करण्यात आली.
मुस्लिम बांधवांचे पवित्र उपवास, या रमजानच्या महिन्यात असतात,पंढरपूर शहरात कायमच हिंदू आणि मुस्लिम बांधवात सामाजिक सलोख्याचे वातावरण दिसून आले आहे, या शहरात सर्व जातीबांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत,आषाढी एकादशीला बकरी ईद, आली तर येथील मुस्लिम समाज बकरीचा कुर्बानी देत नाही, या समाजातील अनेक मुस्लिम बांधव हे श्रीविठ्ठल भक्त आहेत.यामुळे या इफ्तार पार्टीचे महत्व वेगळे आहे, जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण आणि सौहार्दपूर्ण शांतता टिकवण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन ही काळाची गरज आहे, यावेळी मुस्लिम समाजातील जेष्ठ व
भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*