*रामभाऊ जोशी हायस्कूल येथे वनविभाग सोलापूर अंतर्गत परीक्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने माहितीवर्गाचे आयोजन* *चित्ता परत येतोय...!*

करकंब/ प्रतिनिधी
दिनांक14 सप्टेंबर केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण विभागाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या सोलापूर वनविभाग परिक्षेत्र पंढरपूर अंतर्गत रामभाऊ जोशी हायस्कूल येथे चित्त्याबाबत शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी वनविभागामार्फत माहीती वर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक विनय कुलकर्णी यांनी 72 वर्षांनी भारतात चित्ता येतोय. देशात 1952 मध्ये राजस्थान मध्यप्रदेशातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. आज ७२ वर्षांनी 17 सप्टेंबर रोजी चिता भारतातील मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पामध्ये आणून सोडले जाणार आहे असे सांगितले. प्रशालेतील संगीत शिक्षक संजय पंचवाडकर यांनी चित्त्याचे अन्न व अधिवास,सध्या आफ्रिका, इराण, केनिया, युगांडा,झिंब्बाबे या देशात आढळून येतात असे सांगितले. या चर्चासत्रास प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे, राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचे समन्वयक महादेव पुजारी, वनविभाग कर्मचारी जावेद मुलाणी,विनायक कुलकर्णी,नागेश घुले, सुरेश दहीगीरे,संजय पंचवाडकर, संजय पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.