*पार्टी प्रमुखाचे नाही लक्ष.... पुन्हा निवडून येईल का पक्ष.....!* *करकंब अनेक समस्यांच्या विळख्यात.*

करकंब /प्रतिनिधी :-
करकंब सारख्या तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावात गावातील पार्टी प्रमुखांचे गावगाडा चालवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात,, याची कसरत त्यांना प्रत्येक निवडणुकीच्या वेळी येत असते. गावगाड्यातील पार्टी प्रमुख पुन्हा तालुक्याच्या पक्षाच्या संलग्न होतो. पार्टी प्रमुख आणि पक्ष एकमेकात मिसळून ज्या गावाच्या विकासासाठी योजना असतात ..लोक कल्याणासाठी तसेच मूलभूत सुविधा समस्या या निवारण करण्याचे काम पार्टी प्रमुखाच्या माध्यमातून गावगाड्यातून चालवले जाते. मात्र याला अपवाद करकंब गावात आल्यावर अगदी बस स्थानकापासून ते प्रमुख रस्त्यावर , अंतर्गत मार्गावर आणि
गल्लोगल्लीत गेल्यानंतर याची प्रचिती येते. पार्टी प्रमुखाचे नाही लक्ष... कसा निवडून येणार पुन्हा पक्ष. अशी जोरदार चर्चा सर्वसामान्य लोक , ज्येष्ठ नागरिक , युवक वर्ग, विशेषता महिला वर्गातून केली जात आहे.
गेल्या काही महिन्यापासून जागर स्वच्छता अभियान टीम गावभर स्वच्छता ..करीत असताना नागरिक आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असून केवळ हे ग्रामपंचायत चे अपयश असल्याची चर्चा केली जात आहे.
*दत्त मंदिर ते रोहिदास नगर ते दावजीबुवा चौक ते देशमुख देशमुख गल्ली अस्वच्छता व घाणीच्या विळख्यात.*
हा मार्ग मुख्य मार्गास जोडल्याने तसेच या मार्गावरून शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, देवदर्शनासाठी जाणारा या परिसरातील लोकांसाठी हा रस्ता असल्याकारणाने या रस्त्याच्या कडेला गेल्या अनेक वर्षापासून झाडलोट केली गेली नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड कचऱ्याचे साम्राज्य ,घाणीचे दुर्गंधी सगळीकडे पसरलेली अस्वच्छता या कारणामुळे या परिसरातील लोकांचे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले तरी ना पार्टी प्रमुखाचे लक्ष आहे,, ना प्रशासनातील ग्रामविकास अधिकाराचे लक्ष आहे ग्रामपंचायत प्रशासनामुळे व त्यांच्या होत असलेल्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना उपचारासाठी खाजगी दवाखान्याच्या आधार घ्यावा लागत आहे.
*बस स्थानक परिसर व बाजार तळावरील अस्वच्छता दूर व्हावी-हनुमंत बाबर*
करकंब बस स्थानक परिसर हा नेहमी गजबजलेला असतात तसेच महिला विद्यार्थी विद्यार्थिनी गावकरी बांधून येणारे जाणारे प्रवासी परिसरातील येणारे नागरिक या लोकांना या परिसरात असलेली अस्वच्छता आणि त्यांच्या साम्राज्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतो त्यातच विशेषता टिळक चौकात येथे भरणाऱ्या बाजार तळावरील सोमवारी झालेल्या बाजाराची दुसऱ्या दिवशी स्वच्छता व घाणीचे साम्राज्य त्वरित स्वच्छ केले जात नाही. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून या दोन्ही भागातील अस्वच्छता त्वरित दूर व्हावी. असे यावेळी हनुमंत बाबर यांनी सांगितले.
गाववाड्यातील पार्टी प्रमुखाचे मूलभूत सुविधांकडे पूर्णता दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत असून काय... घडतय,, काय.... बिघडतंय. याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशा परिस्थितीतही काय ते गावातले रस्ते... काय ती अस्वच्छता. काय ते घाणीचे साम्राज्य.. भाऊसाहेब.. सगळं कसं एकदम ओके मध्ये हाय....! अशी अगदी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगचा प्रत्यय गेल्या अनेक दिवसापासून करकंब येथील नागरिकांना आणि आसपासच्या गावातील येणाऱ्या लोकांना येत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांतून सहाजिकच पार्टी प्रमुखाचे नाही लक्ष... पुन्हा निवडून येईल का पक्ष...! असे बोलले जात आहे.