*राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निरीक्षक* *राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय* *प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या उपस्थितीत झाली मुंबई येथे बैठक*

पंढरपूर / प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उद्योग व्यापार विभागाची प्रदेश कार्यकारणीची बैठक मुंबई येथे पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या प्रमुख उपस्थीतीमध्ये पार पडली. यामध्ये या विभागासाठी प्रत्येक जिल्हयासाठी स्वतंत्र निरीक्षक नेमणूक करण्यासाठी महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
यावेळी राज्यातील प्रमुख महत्वाच्या विषयावरती प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आला.राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यासाठी उद्योग व व्यापार विभासाठी पक्ष निरिक्षक आवश्यक असुन लवकरच त्यासंदर्भात राज्याचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील साहेब यांच्यासोबत लवकरच चर्चा करून प्रत्येक जिल्हयात एक निरिक्षक नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.आदरणीय प्रांताध्यक्ष ना.जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थीतीमध्ये पक्ष सदस्य नोंदनीची सुरुवात करण्यात आली होती ती राज्यभरात उत्तम नियोजन करुन जास्तीत जास्त सदस्य पक्षासोबत जोडण्याचा संकल्प आजच्या बैठकीत करण्यात आला.प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये विशेष अशी मोहीम राबऊन सदस्य नोंदनीच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.राज्यभरात सर्व नियुक्त्या होत असताना आणखीन काही ठिकाणी जिल्हाध्यक्ष व तालुक्याच्या कार्यकारणी अपूर्ण असुन तेथील पक्षाच्या फादरबॉडीच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा करून लवकरच राहीलेल्या नियुक्त्या पूर्ण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी अडचणीत आलेल्या उद्योग व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी या सेलची निर्मिती केली होती त्याच मुख्य विषयाकढे लक्ष देऊन जिल्हा तालुका आणि राज्यस्तरीय उद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबीरे भरऊन नवीन युवा उद्योजकांना या प्रवाहात सामील करुन घेत अडचणीत आलेल्या छोटया मोठया उद्योजक व्यापारी वर्गाच्या मुख्य अडचणी सोडवण्यावरती भर देण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग केंद्राशी संपर्क साधुन बेरोजगार मेळावे भरवत राज्यातील बेरोजगार तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता छोटेमोठे व्यवसाय उभे करून ते उत्तमप्रकारे चालवण्यासाठी मार्गदर्शन मेळावे घेण्याचा ठराव करण्यात आला.राज्यात लवकरच स्थानीक स्वराज्य संस्था तसेच नगरपालीका निवडनुका होणार असुन त्यादृष्टीने आपल्या विभागाची तयारी काय आहे त्यासाठीचं उत्तम नियोजन लवकरच प्रत्येक जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी केलं जाईल त्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी या निवडनुकीत स्वतःला पूर्ण झोकुन पक्षाला यश मिळऊन द्यावं आशा प्रकारचं आव्हाण केलं.जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी पक्षविरहीत काही व्यापारी आणि कामगार संघटना असुन त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना येत असलेल्या अडचणी लक्ष देऊन त्या अडचणी सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत आशा प्रकारच्या सुचना पदाधिकाऱ्यांना दिल्या असुन त्या पध्दतीने सर्व पदाधिकारी योग्य ती जबाबदारी पार पाडतील याचा विश्वास वाटतो.पक्षाचं काम उत्तमप्रकारे करत असताना ग्राउंड लेवलला अनेक पदाधिकाऱ्यांची ही उत्तम कामगिरी असुन ती कामगीरी सर्वसामांन्य जनतेपर्यंत पोहचवण्यात हे पदाधिकारी कमी पडत असतात ते उत्तम प्रकारे पोहचवण्यासाठी प्रत्येकांनी सोशल माध्यमाचा योग्य प्रकारे वापर करून घेण्याचं आव्हाण यावेळी पदाधिकाऱ्यांना केलं.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्योग व्यापार विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब देशमुख,केतन सदाफुले प्रदेश सचिव मा.श्री.कल्याण कुसुमडे,प्रदेश सरचिटणीस मा.श्री. दिनेश मोरे,प्रदेश चिटणीस मनिषा भोसले,मा. श्री.जगदीश सुरवसे, विशाल रावत, श्री.सामिर गुधाटे, श्री.शरिफ मेमन,श्री.प्रशांत देवरे,शेख रमजान,श्रीकांत पवार पारिजात दळवी,पांडुरंग औटी इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते