*सहकार शिरोमणीबाबत प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे झाली सुनावणी*  *करखान्याकडून सभासद यादी देण्यासाठी मागितली मुदत, तर तक्रारदार दीपक यांच्याकडून परत एखदा झाली कारखान्यावर प्रशासक नियुक्तीची मागणी*

*सहकार शिरोमणीबाबत प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे झाली सुनावणी*   *करखान्याकडून सभासद यादी देण्यासाठी मागितली मुदत, तर तक्रारदार दीपक यांच्याकडून परत एखदा झाली कारखान्यावर प्रशासक नियुक्तीची मागणी*

पंढरपूर/प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी यांना  तक्रारदार दीपक पवार यांच्या मागणीनुसार ,प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांनी सभासद यादी घेऊन हजर राहण्याचे आदेश दिले होते.
 त्यानुसार आज  सुनावणीसाठी कारखान्याचे डेप्युटी जनरल मॅनेजर कैलास कदम तसेच तक्रारदार दीपक पवार हजर होते. 
आज सुनावणी दरम्यान अजूनही  कारखान्याने याद्या देण्यास परत एकदा टाळाटाळ केली ,तसेच सभासद यादीसाठी लागणाऱ्या झेरॉक्स प्रतीचे पैसे भरून घेतल्यानंतर एक महिन्याच्या आत मध्ये आम्ही यादी देऊ असे मोघम पत्र दिले होते.परंतु त्या पत्रामध्ये नक्की किती रक्कम भरावी याचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे प्रादेशिक सहसंचालक दराडे सो यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली .
याबाबत दीपक पवार यांना त्यांचे म्हणणे विचारले असता, दीपक पवार यांनी मी आजच रक्कम भरणयास तयार असून मला दिनांक १६ डिसेंबर पर्यंत याद्या मिळाव्यात,असा  आग्रह धरला तेंव्हा याद्या त्वरित उपलब्ध करून द्याव्या असे सांगितले.  यावेळी सुनावणीसाठी कारखान्याच्या वतीने उपस्थित असलेले कारखान्याचे अधिकारी कदम यांच्याकडून तसे लेखी घेतलेआहे.