*मनसेकडून कर्तव्य पार पाडण्याची भूमिका सुरूच*! *डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते महिलांसाठी साडी वाटप*

*मनसेकडून कर्तव्य पार पाडण्याची भूमिका सुरूच*!  *डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते महिलांसाठी साडी वाटप*

पंढरपूर/प्रतिनिधी

मागील चार वर्षांपासून मनसेच्या माध्यमातून विविध घटकांतील गरजू लोकांना आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी दिलीपबापू धोत्रे यांनी मदतकार्य मोठया दिलदार वृत्तीने सुरू ठेवले आहे .पंढरीतील अनेकांना आता दिलीपबापू धोत्रे हेच आधार वाटू लागले आहेत.

 अशातच  विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त  पंढरपूर शहरातील सेंट्रल नाका परिसरातील माता-भगिनींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले.

 यावेळी विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे, नगरसेवक संजय बंदपट्टे, मनसे व्यापार सेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले ,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे, मी वडार महाराष्ट्राचा चे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले ,मनसेचे उपशहर अध्यक्ष महेश पवार, गणेश पिंपळनेरकर, शुभम काकडे ,विकी चव्हाण ,विभाग अध्यक्ष नागेश इंगोले ,मनसे महिला शहराध्यक्ष रंजनाताई इंगोले ,सचिन सुतार ,सुरज देवकर ,विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अवधूत गडकरी, सागर घोडके ,संतोष  काळुंगे, सौ जाधव ताई, राहुल ननवरे, संतोष ननवरे,  सोमनाथ देवकर, अभिषेक ननवरे ,आदित्य छापचडी, अभिमान डुबल इत्यादी उपस्थित होते.