*विठ्ठल परिवारातील होता तर... पुण्यात मीटिंग का घ्यावी लागली-भगीरथ भालके* *शेतकरी सभासदांच्या अडचणी दूर करण्याऐवजी पायात पाय घातला नसता तर ही वेळ आली नसती.* *शेतकरी सभासद मालकीचा असलेला कारखाना कधी खाजगी होईल हे माहिती होणार नाही.*

*विठ्ठल परिवारातील होता तर... पुण्यात मीटिंग का घ्यावी लागली-भगीरथ भालके*   *शेतकरी सभासदांच्या अडचणी दूर करण्याऐवजी पायात पाय घातला नसता तर ही वेळ आली नसती.*   *शेतकरी सभासद मालकीचा असलेला कारखाना कधी खाजगी होईल हे माहिती होणार नाही.*

करकंब/ प्रतिनिधी

:-श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीच्या माध्यमातून कै. माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील, कै.वसंतदादा काळे ,कै. आमदार भारत नाना भालके कै.  कृष्णात भाऊ पुरवत सर्वांच्या सहयोगातून श्री विठ्ठल परिवार एक संघ ठेवण्याची भूमिका या शेतकरी सभासदांच्या माध्यमातून पार पाडत असताना या श्री विठ्ठलच्या गळीत हंगामामध्ये आणि शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांच्या बाबत वेगळी भूमिका घेऊन व वारंवार अडचणी आणून शेतकऱ्यांच्या हिताचे सोडून या सभासदांच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याच्या ऐवजी नेहमीच पायात पाय घालण्याचे काम करण्याचे मोठे पाप या लोकांनी केल्याने आज ही वेळ आली असल्याचे मत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी व्यक्त केले.
करकंब येथील श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या युवा नेते व या पॅनलचे उमेदवार अभिषेक पूरवत व उमेदवाराच्या प्रचारार्थ बोलत होते. यावेळी सहकार शिरोमणी चेअरमन कल्याणराव काळे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन नरसप्पा देशमुख, राज्याचे मनसेचे सहकार नेते दिलीप धोत्रे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच प्रतिनिधी शरदचंद्र पांढरे, राहुल शिंगटे, प्राध्यापक सतीश देशमुख, मुस्तफा बागवान, घनश्याम शिंगटे, लक्ष्मण नलावडे, राणू अण्णा शिंदे, हरिभाऊ दगडे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, विवेक शिंगटे, आदि सह  पदाधिकारी ,शेतकरी सभासद ग्रामस्थ कार्यकर्ते बहुसंख्येनेउपस्थित होते.
भर पावसात ही करोळे उंबरे कान्हापुरी सांगवी बादलकोट जळवली नांदुरे भोसे करकंब आरडी आधी विविध गावातील शेतकरी सभासदांची प्रचंड गर्दी यावेळी दिसून आली.
पुढे बोलताना भालके यांनी माझ्या विरोध गेल्या सहा महिन्यापासून तालुक्यात असं चित्र निर्माण केलं की जे शेतकरी सभासदांचे बिल केवळ माझ्यामुळे देता आले नाही परंतु 25 हजार 392 शेतकरी सभासद असताना 830 ऊस उत्पादक सभासद आणि 230 गेट केन सभासद असे पेंडिंग बिल असतात नाही या बिलाचे साखरपोती विक्री करून हे बेल आदा करावे हे आदेश असताना मग तुम्ही विठ्ठल परिवारातील होता तर वेगळी भूमिका घेऊन आडकाठी का आणली आणि पायात पाय घालून शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांच्या हाती जे बिल मिळणार होते त्याचे मोठे पाप का केले. आणि पुण्याला ऐतिहासिक मीटिंग का घ्यावी लागली. मी आजपर्यंत विठ्ठल परिवार एक संघ ठेवण्याची भूमिका पार पाडली आहे. या लोकांनी अडचणी आणल्या नसत्या तर गेल्या 2000 एप्रिल 2021 चा गळीत हंगाम पणाने पार पाडण्याची भूमिका घेतली होती. एकीकडे वारंवार अडचणी आणून आरोप प्रत्येक रोप करायचे दुसरीकडे ऐतिहासिक मिटींगला घेऊन शेतकरी सभासद आणि कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याची ही भूमिका आजपर्यंत पार पडल्यामुळे आज ही वेळ या लोकांमुळे आले असल्याचे परखड मत यावेळी व्यक्त केले. यावेळी सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी या पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे शेतकरी सभासद वर्गांना आवाहन केले. या जाहीर सभेत मनसेचे राज्याचे सहकार नेते दिलीप बापू धोत्रे, प्राध्यापक सतीश देशमुख, आदि सह उपस्थित मान्यवरांनी उपस्थित शेतकरी शेतकरी सभासदांना मार्गदर्शन केले.
या सभेवेळी 75 वर्षाच्या सभासद वयोवृत्त महिलेने सर्व उपस्थित सभासद शेतकरी वर्गांना या पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व शेतकरी सभासद वर्ग यांचे विशेष आभार सरपंच प्रतिनिधी एडवोकेट शरदचंद्र पांढरे यांनी मानले.

चौकट

सहकार रत्न कै. कृष्णात भाऊ पूरवत  यांच्या विचाराने आणि तत्त्वनिष्ठेने चालणारा या भागातील शेतकरी सभासद असून आज पर्यंत मीही या भाऊंच्या विचाराने या भागातील शेतकरी सभासद पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन आज पर्यंत काम करत असून या सहकार च्या माध्यमातून सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जास्तीत जास्त सभासदांच्या मतदार रुपी आशीर्वादाने पुढील काळात काम करणार 

युवा नेते-अभिषेक पूरवत