*देर सही ... दुरुस्त आये* *विठ्ठलच्या निवडणुकीत खऱ्याखुऱ्या विरोधकाची एन्ट्री* *डॉ. बी.पी. रोंगे यांचा पॅनल निवडणुकीत दाखल

*देर सही ... दुरुस्त आये*  *विठ्ठलच्या निवडणुकीत खऱ्याखुऱ्या विरोधकाची एन्ट्री*  *डॉ. बी.पी. रोंगे यांचा पॅनल निवडणुकीत दाखल

पंढरपूर /प्रतिनिधी
विठ्ठल कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार अशी परिस्थिती पंढरपूर तालुक्यात निर्माण झाली होती. या निवडणुकीत आता खरेखुरे विरोधक डॉ. बी.पी. रोंगे हे उतरले असून, शुक्रवारी त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. यामुळे इतर विरोधकांचे धाबे दणाणले आहे.


दिवंगत आ. भारत भालके कारखान्याचे चेअरमन असताना, डॉ. रोंगे यांनी विठ्ठलची निवडणूक लढवली होती. तालुक्यातील सर्व पुढारीगण एका बाजूला असताना मोठा लढा दिला होता. या निवडणुकीने कै. आ. भालके यांनाही घाम फुटला होता. याचवेळी त्यांनी विठ्ठल कारखाना थोड्याच दिवसात रसातळाला जाण्याची परिस्थिती निर्माण होईल, असेच प्रचारादरम्यान सांगितले होते. त्यांच्या जोरदार प्रचार यंत्रणेने पहिल्याच प्रयत्नात सुमारे सहा हजार मते मिळवून दिली होती. तेव्हापासूनच विठ्ठलची निवडणूक म्हटले की, डॉक्टर रोंगे यांचे नाव शेतकरी सभासदांसमोर आल्याशिवाय राहत नाही.


या निवडणुकीत विरोधकांची गर्दी पाहून, रोंगे यांनी देखते रहोची भूमिका घेतली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अचानक २१ उमेदवारी अर्ज भरले होते. यात त्यांचा स्वतःचाच अर्ज नामंजूर झाला होता.


शुक्रवार दि.२४ जून रोजी अचानकच त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. यामुळे ही निवडणूक कमालीची चुरशीची होणार असल्याचे जाणवू लागले आहे. या निवडणुकीत खऱ्याखुऱ्या विरोधकाची एंट्री झाल्याचा आनंद अनेक शेतकरी सभासदांना झाला आहे.


पंढरपूर बसस्थानकासमोर त्यांच्या पॅनलचे कार्यालय उघडण्यात आले असून, याच ठिकाणाहून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

चौकट

कधीकाळी विठ्ठलची निवडणूक लढवण्यासाठी
विरोधक मिळत नव्हता. अशीच परिस्थिती या कारखान्याची होती. आता मात्र ही निवडणूक चौरंगी होत असल्याचे चित्र दिसत आहे. सत्ताधारी भगीरथ भालके गटाला हा मोठा हादरा असल्याच्या प्रतिक्रिया, नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.