*लेकी ने केला पित्याचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा*

*लेकी ने केला पित्याचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा*


 


कासेगाव:/प्रतीनीधी 

कासेगाव तालुका पंढरपूर येथील सेवानिवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मा.श्री अजीज महंमद कोतवाल यांचा  ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस त्यांची कनिष्ठ कन्या प्रा.परवीन वडगांवकर हिने पुण्याहून पंढरपूरात येऊन उत्साहात साजरा केला आणि नव्या पीढी समोर आई-वडिलांचा सन्मान करण्याचा एक आदर्श निर्माण केला.

     सांगली जिल्ह्यातील नागज गावचे रहिवासी श्री कोतवाल गुरुजी  हे १९७५ सली कासेगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी कासेगाव व पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले.त्यांचे अनेक विद्यार्थी सामाजिक,  शैक्षणिक, राजकीय, कृषी, न्यायिक व वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात  विविध पदावरती कार्यरत आहेत. तत्कालीन परिस्थितीत गुरुजींनी व त्यांची पत्नी सौ.खुरेशाबी कोतवाल (सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका) यांनी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या परीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे धोरण अवलंबिले होते, त्यामुळेच कासेगाव व कासेगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना आदरणीय कोतवाल गुरुजींविषयी आजही आदर असल्याची भावना जिल्हा परिषदेचे सदस्य मा.श्री वसंतराव देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केली.

     वडिलांचा ७५वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन व आयोजन प्रा.परवीन वडगांवकर यांनी करून कार्यक्रमानिमित्त सर्वांना एकत्र आणले.सदर कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.श्री विजयसिंह बाळासाहेब देशमुख व मा.श्री प्रशांतभैया अण्णासाहेब देशमुख उपस्थित होते तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री बाळासाहेब शेख,,श्री तैमूरशहा इनामदार,श्री गफूर जमादार, पितांबर कापसे, ऍड.सुभाष देशमुख,श्री अण्णा खिलारे ,प्रा.संतोष गंगथडे,प्रा. सुनील गवळी, श्री दादासाहेब गावंदरे, प्रा. डॉ.बळवंत,प्रा.दत्ता खिलारे, श्री.आप्पा साखरे , गुरुजींचे जिवलग मित्र श्री भाऊसाहेब देशपांडे,श्री ताजुद्दीन मुलाणी, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रसाळ गुरुजी, पीसे गुरुजी (नागज),दौंड गुरुजी (पाचेगाव) तसेच कासेगाव व पंचक्रोशीतील गुरुजींचे सर्व आप्तेष्ट पाहुणे , गुरुजींचा संपूर्ण परिवार तीन मुली,तीन जावई ,मित्रपरिवार ,विद्यार्थी -गण मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.परवीन वडगावकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.