*शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा-जिल्हा कृषी अधिकारीबाळासाहेब शिंदे*

करकंब/ प्रतिनिधी
-शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळावे या उदात्त हेतून शासनस्तरावरून शेतीपूरक विविध योजना राबविल्या जात आहेत याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले
बार्डी ता पंढरपूर येथील जि.प.प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती येथे जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सदिच्छा भेट देऊन शाळेबाबत समाधान व्यक्त करीत शाळेभोवती असलेली हिरवळ याबाबतही आनंद व्यक्त केला.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना बाळासाहेब शिंदे बोलत होते यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर,तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार, महेश देवकते,बारवकर,गावंडे, प्रमोद डोके,आदर्श गाव अध्यक्ष तळेकर,पांडुरंग सह.कारखाना माजी संचालक दिनकर कवडे,सरपंच माधूरी कवडे,अभिजित कवडे,ग्रामसेवक चंद्रशेखर गिड्डे यांनी शाळेला भेट दिली.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमेची पूजा करून शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी शाल फेटा बांधून सत्कार केला.शाळेचा हिरवागार परिसर,लावलेली झाडे,वर्गखोल्या पाहून समाधान व्यक्त केले.
वाफळकरवस्ती परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक असणाऱ्या सवलती,तसेच शिवाजी वसेकर,गोरख वसेकर यांच्या नेटींग बेदाणा मशिनला भेट देऊन असणाऱ्या सवलती मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करु असे सांगून सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कांतीलाल वसेकर,सुनील वसेकर पोलीस पाटील नाना शिंदे ग्रामपंचायत सदस्य पंडीत खंदारे,बिभीषण वसेकर,रामा वसेकर,बिभीषण नाईकनवरे,सचिन वसेकर,तसेच भेट दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक वसेकर,नितीन वसेकर,जयवंत वसेकर,समाधान वसेकर,भानुदास माळी,संजय माळी,मुख्याध्यापक किरण ढोबळे यांनी आभार व्यक्त केले.