*युवक राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शहाजी मुळे यांच्या वाढदिवसा निमित्त गरजूंना मदत!*

*युवक राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शहाजी मुळे यांच्या वाढदिवसा निमित्त गरजूंना मदत!*

पंढरपूर:-प्रतिनिधी


सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मा.शहाजी मुळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले.वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी गरजूंना आर्थिक मदत केली.

कोरोनामुळे अकाली निधन झाल्याने अनाथ झालेल्या स्व.सुभाष हुबाले यांच्या लहानग्या मुलांना १० हजार रुपये अर्थसहाय्य करून शहाजी मुळे फ्रेंड सर्कलने त्यांचा वाढदिवस साजरा केला.

माझा गाव, माझ्या गावातील लोकं दुःखात असताना मी आनंदोत्सव साजरे करणे उचित ठरणार नाही.प्रार्थना करणार्‍या दोन हातांपेक्षा मदत करणारा एक हात श्रेष्ठ असतो हेच त्यांनी या कृतीतून दाखवून दिले.

मा.शहाजी मुळे हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.मागील वर्षी त्यांनी आपला वाढदिवस पंढरपूर येथील 'सावली अनाथाश्रमात' तेथील मुलांसोबत साजरा केला होता.वृक्षारोपण तसेच उंबरे शाळेसही खोखो पोल वाढदिवसानिमित्त दिले होते.

यावेळी सर्वश्री मा.अमर इंगळे स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष, तानाजी व्यवहारे,लक्ष्मण हुबाले, नागनाथ कदम,भिमराव देशमुख, पांडुरंग माळी,सागर थिटे, धनाजी ढोबळे, समाधान कानगुडे, योगेश इंगळे, विजय मुळे, अरूण कानगुडे, शिवाजी वावरे, नितीन रोंगे, विठ्ठल कोरके, जोतीराम ढोबळे, बालाजी ढोबळे, लालासाहेब वावरे, धनाजी हुबाले, केशव हुबाले, शोयब मुलाणी,रोहिदास कानगुडे, सचिन मुळे आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी मा.शहाजी मुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या!