अंगणवाडी सेविकांना निकृष्ट दर्जाचे फोन*, *सेविकांचे आंदोलन*.

* करकंब/ प्रतिनिधी
-शासनाने पंढरपूर तालुक्यातील अंगणवाडी तील सेविकांना दिलेले फोन निकृष्ट दर्जाचे असून हे फोन सतत बिघडत असतात. दिलेल्या निकृष्ट फोनचा अंगणवाडी सेविकांसाठी कुठल्याही शासकीय कामास नीट वापर करता येत नाही. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी शासनाने दिलेल्या निकृष्ट फोन बाबत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन आले .या अंगणवाडी सेविकांना दिलेले फोन सातत्याने बिघडत आहेत. सतत हँग होतात, सतत हँग होतात त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागते. दिलेल्या फोनची रेंज येत नाही. त्यामुळे शासनाला लोकेशन द्वारे अंगणवाडी सेविका यांना काम करणे कठीण झाले आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक 17 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्रभर फोन बंद करून व सदर चे फोन शासनाला परत करून अंगणवाडी सेविकांचे हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे लेखी निवेदन अमृत सरडे बाल विकास प्रकल्प अधिकारी पंढरपूर यांना अंगणवाडी कर्मचारी पंढरपूर तालुका यांच्यावतीने दिले आहे . वेळी पंढरपूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.