चेअरमन अभिजीत पाटील यांचा उत्कृष्ठ कामगिरीबद्द्ल सत्कार

प्रतिनिधी/ पंढरपूर
देशात कोरोना सारख्या महामारीचे संकट आहे त्यामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत असल्याने म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांना ऑक्सीजन निर्माण करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा श्री अभिजीत आबा पाटील यांनी लगेच आपल्या कारखान्यावर प्रकल्प उभा करण्याचा मानस केला आणि अगदी कमी कालावधीत ऑक्सिजन प्रकल्प पूर्ण केला.व उदघाटन प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह अनेक मान्यवरच्या व्हर्च्युअलपणे उदघाटन करण्यात आले.
ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन होऊन कार्यान्वित झाला त्यामुळे कोरोना काळात आता
ऑक्सीजन मुळे लाखो लोकांचे प्राण वाचणार आहेत त्यामुळे चळे गावचे माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष मा श्री उमेश काका मोरे, सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस चे माजी उपाध्यक्ष गणेश ननवरे, होळे गावचे योगेश होळकर यांनी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा श्री अभिजीत आबा पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, संदीप खारे, सुरेश सावंत, सजंय खरात, दिपक आदमिले उपस्थित होते.