प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी लाटलं तीन एकर गायरान* *उंबरे ग्रामस्थांचे उपोषण सुरू* *पंढरपूर तालुक्यातील प्रकार*

प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी लाटलं तीन एकर गायरान*  *उंबरे ग्रामस्थांचे उपोषण सुरू*  *पंढरपूर तालुक्यातील प्रकार*

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर तालुक्यातील उंबरे (पागे) येथे अजब किस्सा घडला असून,
येथील तीन एकर गायरानावर प्रहारच्या पदाधिकाऱ्यानेच अतिक्रमण केल्याची घटना उघडकीस आली आहे.बापू मोहिते याने केलेल्या या कृत्यविरोधात येथील ग्रामस्थांनी उपोषण आरंभले आहे.

उंबरे येथील गायरानापैकी तीन एकर गायरान प्रहार संघटनेचे जिल्हासंघटक बापू मारुती मोहिते , याने अतिक्रमण केले आहे.तीन एकर जमीन वाहिवाटीत आणून त्यात ऊस आणि इतर पिकांची लागवड केली आहे.त्यांच्या इतर नातेवाईकांनीही याच प्रकारचे अतिक्रमण करून गायरान बळकावले आहे.ही गायराने अतिक्रमणात संपून गेल्याने शेतकऱ्याच्या गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे.या घटनेची गंभीर दखल घेत येथील ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.येथील गट नं. ४२  वरील ही अतिक्रमणे तात्काळ काढून गायराने खुली करावित अशी मागणी  या ग्रामस्थांकडून होत आहे. 
सदर ग्रामस्थांनी सोमवारी पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शहाजी मुळे,मारुती प्रल्हाद कोरके, नामदेव अवचित मुळे,विजय मुळे,देविदास म.कदम,राजेश कानगुडे, भीमराव देशमुख,हरिदास कानगुडे,आंबदास कानगुडे यांचा या उपोषणकर्त्यांमध्ये समावेश आहे.