*भावी आमदार व नूतन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह शिंदे करकंब च्या बाबत कोणती निर्णायक भूमिका घेणार*.......?

*करकंब /प्रतिनिधी
माढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार बबन दादा शिंदे यांच्या मतदारसंघातील करकंब हे सर्वात मोठ्या लोकसंख्येचे असणारे गाव व आमदार बबनदादा शिंदे त्यांचे सुपुत्र भावी आमदार व नूतन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह शिंदे यांना मानणारा व त्रिकोट असा गट असून ज्यांना या मतदार संघाचे भावी आमदार म्हणून पाहिले जाते, अशा भावी आमदार आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह शिंदे यांनी माढा- पंढरपूर मतदारसंघातील करकंब या गावाकडे पूर्णता दुर्लक्ष केल्यामुळे आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये नेमकी कोणती निर्णायक भूमिका घेणार..? याकडे करकंब करांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभेला लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांना करकंब करानी आज पर्यंत मोलाची साथ दिली असून मात्र लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे व त्यांचे सुपुत्र भावी आमदार व नूतन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह भैया शिंदे यांनी ना ग्रामपंचायत ना जिल्हा परिषद वा पंचायत समिती वा इतर कोणत्याही निवडणुकीत स्वतः लक्ष घालून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत असताना प्रचारासाठी राष्ट्रवादीचे पक्षाचेआमदार म्हणून आले नाहीत. व याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाढीसाठी निष्ठावंत , कट्टर समर्थक , पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आज पर्यंत निर्णायक भूमिका आज पर्यंत घेतली नसल्याचे बोलले जात आहे.करकंब मध्ये आमदार बबनदादा शिंदे व भावी आमदार व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष यांना मानणाऱ्या त्रिकोट असणाऱ्या गटांना यापूर्वीही एकत्रित बसवून जिल्हा परिषद पंचायत समिती, ग्रामपंचायत व इतर स्थानिक निवडणूका बाबत विशेषता विकासाच्या भूमिकेबाबत कोणतीच ठोस निर्णय भूमिका घेतली नसल्याची चर्चा ही होत आहे. राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून करकंब मध्ये तीन गट कार्यरत आहेत. विधानसभेला एक तर जिल्हा परिषद पंचायत समितीला वेगळी भूमिका... आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये डोळ्यावर पट्टी अशा धोरणामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये घड्याळ्याची टिकटिक वाजते की...? पुन्हा कमळ फुलणार याकडे करकंब चे लक्ष वेधून राहिले आहे.*
*करकंब जिल्हा परिषद गट हा जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांचा बालेकिल्ला मानला जातो. जिल्ह्याचे अभ्यासू आमदार सध्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम पाहत आहेत . आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने करकंब हे गाव सर्वात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे सायलेंट किलर म्हणून गाव राहणार असून या गावाशी संलग्न असलेल्या बार्डी, जळवली, उंबरे करोळे कान्हापुरी, सांगवी, बादलकोट, नेमतवाडी नांदुरे ,पटवर्धन कुरोली, मेंढापूर ,शेवते ,भोसे ,या गावासह इतर गावातील लोकांचा सततचा संपर्क असल्याने करकंब च्या राजकीय घडामोडी वरच या गावांची असलेली निर्णायक भूमिका अवलंबून असल्याने इतर गावांचे लक्ष वेधून राहिले असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा तालुका पदांची खैरात झाली. तशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून धुमधडाक्यात जिल्हा व तालुक्याच्या पदांची वाटप झाली होती. आता येणाऱ्या काळात आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकावण्याचा प्रयत्न तरी करणार का..? विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे विद्यमान पाणीदार आमदार बबन दादा शिंदे यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.*
*करकंब ,भोसे यासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात तसेच अगदी ग्रामीण भागात जिल्ह्याची पदे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडे आहेत. गेल्या अनेक वर्षापासून करकंब येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे असलेला करकंब नळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. तसेच मुस्लिम समाज दफनभूमी ला जागा मिळत नसल्याने मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न अद्याप मिटला नाही. पूर्व भागातील दुष्काळजन्य असलेल्या शेतकऱ्यांची पाण्याची समस्या आहे तशीच आहे.धाकटी वेस ते जळवली चौक कडे जाणाऱ्या गाव ओढ्यावरील पूल अनेक वर्षापासून खचला असून अनेकांचे जीव धोक्यात येत असतानाही याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले असून त्यातच जिल्ह्याच्या अभ्यास आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी कृषी उत्पन्न उप बाजार समितीला मंजुरी देऊन अनेक वर्षे उलटली तरी जागा मिळत नाही, युवकांच्या हाताला रोजगार नाही. खासदार, आमदार, जिल्हा परिषद , ग्रामपंचायत च्या माध्यमातून कोट्यावधीच्या आलेल्या निधीतून रस्ते कुठे गायब होतात .. ग्रामीण भागातील रस्त्यांची आहे तशीच अवस्था असल्याने तोही प्रश्न एवढा निधी येऊनही जैसे थे परिस्थिती असल्याने आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी या सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार का ...? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.*