*करकंब येथील शिवरत्न सामाजिक बहुउद्देशीय संस्था व शिवप्रेमी तरुण मंडळाच्या च्या वतीने गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहाने संपन्न....!* *थोरली वेस दहीहंडी फोडण्याचा बहुमान इयत्ता दहावीतील विद्यार्थी रोहन अशोक कुंभार ने मिळवला*.

*करकंब येथील शिवरत्न सामाजिक बहुउद्देशीय संस्था व शिवप्रेमी तरुण मंडळाच्या च्या वतीने गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहाने संपन्न....!*  *थोरली वेस दहीहंडी फोडण्याचा बहुमान इयत्ता दहावीतील विद्यार्थी रोहन अशोक कुंभार ने मिळवला*.

करकंब /प्रतिनिधी 

सोळाव्या शतकातील थोरली वेस् येथील शिवरत्न सामाजिक बहुउद्देशीय संस्था व् शिवप्रेमी तरुण मंडळ थोरली वेस यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या या वर्षीच्या गोकुळाष्टमी निमित्ताने दहीहंडी सोहळा गोविंदाच्या गजराने मोठ्या उत्साहाने शांततेत शांततेत पार पडला*.
*सुरुवातीस थोरली वेस येथे करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. निलेश तारू साहेब यांच्या शुभहस्ते गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाच्या मूर्तीचे आणि या दहीहंडीच्या सोहळ्याचे पूजन करून श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले. यावेळी करकंब बीट अंमलदार श्री. कैलास हरिहर, पोलीस ह. श्री. रमेश फुगे, तसेच शिवरत्न सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य  आणि शिवप्रेमी तरुण मंडळाचे पदाधिकारी, सभासद बाल

गोपाळासह, गावातील बहुसंख्य गोविंदा गोपाळ ग्रामस्थ  उपस्थित होते*.
*या थोरली वेस दहीहंडी सोहळ्यामध्ये अठरापगड समाजातील युवक वर्ग यांनी सहभाग घेऊन हा दहीहंडी सोहळा उत्साहात व शांततेत साजरा केला*.
*चार थर असलेल्या या दहीहंडी सोहळ्या ची थोरली वेस दहीहंडी फोडण्याचा यंदाचा मान शिवरत्न सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या आणि रामभाऊ जोशी हायस्कूल येथे इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या रोहन अशोक कुंभार याने मिळवला*.
*दहीहंडी उत्सव आणि आगामी येणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने करकंब पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेले श्री. निलेश तारू यांनी करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करकंब शहर आणि करकंब ग्रामीणमध्ये दहीहंडी उत्सवाचे निमित्ताने पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. हा दहीहंडी उत्सव शांततेत संपन्न झाला.*