*निवडणूक बार्डीची... प्रतिष्ठा पणाला लागली करकंबच्या देशमुख बंधूंची.....!* *निवडणुकीमध्ये यंदा सत्तांतर घडणार.....?* *पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष...!*

*निवडणूक बार्डीची... प्रतिष्ठा पणाला लागली करकंबच्या देशमुख बंधूंची.....!*  *निवडणुकीमध्ये यंदा सत्तांतर घडणार.....?*  *पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष...!*

करकंब /प्रतिनिधी :

-सध्या पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विशेषता ही निवडणूक पंढरपूर तालुक्यातील बार्डी  ग्रामपंचायतअसलेली सरपंच पदाची निवडणूक पहिल्यांदाच जनतेतून होत असल्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली असून विशेषता सत्ताधारी असलेल्या पार्टीतूनच वेगळा ग्राम विकास पॅनल निर्माण करून विरोधकांबरोबर एकत्रितपणे या निवडणुकीच्या रणांगणात रणसिंग फुंकले आहे. त्यामुळे यंदाची ही निवडणूक नुसत्या बार्डी गावासाठी प्रतिष्ठेचे राहिली नसून तर पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्याच्या प्रतिष्ठेची बनली असल्याचे राजकीय तज्ञातून बोलले जात असून या निवडणुकीमध्ये यंदा बार्डी मध्ये सत्तांतर घडणार का....? अशी चर्चा व कुजबूज करकंब सह परिसरात सुरू आहे .
सद्या बार्डी ग्रामपंचायत मध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दिनकर दादा कवडे , सरपंच अभिजीत भैया कवडे यांची एक हाती सत्ता आहे. त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सातत्याने अनमोल मोलाचे सहकार्य केलेले  भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष -सुरेश अंबुरे , नानासाहेब शिंदे, त्यांचे सर्व सहकाऱ्यांरी,गावातील ज्येष्ठ व युवा वर्ग, विशेषतः महिला अनेक जणांना बरोबर घेऊन जिल्ह्याचे अभ्यासू मा. आमदार प्रशांत मालक परिचारक, मा. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून ताकदीने ही निवडणूक लढवा . माझी ताकद तुमच्या बरोबर आहे. असल्याचे सूचक वक्तव्यही केल्याचे फोटो सहित सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे दादाभाई पटेल यांच्याशी एकत्रित पॅनल तयार करून सत्ताधारी यांच्यासमोर तगडे आवाहन निर्माण केले आहे. त्यामुळे बार्डी चे माजी सरपंच दिनकर भाऊ कवडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सत्ताधारीचे विद्यमान सरपंच अभिजीत भैय्या कवडे यांनीही त्याच जोशाने अभी.. नही... तो कभी नही.... यांनीही आपले सहकारी मित्र सोलापूर जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख आणि बार्डी येथील जनतेची सातत्याने संपर्क ठेवून आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा निर्माण करून विकास कामे खेचून आणलेल्या जोरावर खुले चॅलेंज दिले असल्याने आता विरोधक ही सर्वसामान्य जनता , शेतकरी आणि मतदार राजाला जनतेसमोर असलेल्या काय काय  केलेल्या... व काय न  झालेल्या... कायापालटचा पाढा बोलून दूध का दूध ...और पानी ....का पानी करून यंदा काहीही झालं तरी ...बदल निश्चित करणारच...! परिवर्तन हे होणारच...! या ठाम भूमिकेत या रणांगणात उतरल्याची सोशल मीडिया वरून मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायरल होत आहे.
 बार्डी निवडणूकीस अजून वेळ असतानाही सध्या मात्र बार्डी चे प्रमुख पांडुरंग परिवार प्रणित ग्राम विकास पॅनल व पांडुरंग परिवार चे नेतेमंडळी हे करकंब येथील दोन देशमुख बंधूंच्या सातत्याने संपर्कात असल्यामुळे एकीकडे मा. महिला बालकल्याण सभापती असलेले रजनी ताई देशमुख यांचे पती माजी जिल्हा परिषद सदस्य-बाळासाहेब देशमुख व तर दुसरीकडे त्यांचे बंधू असलेले सोलापूर जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष असलेले करकंबचे विद्यमान उपसरपंच आदिनाथ देशमुख  या दोन देशमुख बंधूंची या बार्डी निवडणूकीत  प्रतिष्ठा पणाला लागली  लागली असल्याची चर्चा या परिसरातून व्यक्त केली जात आहे.

*चौकट :- बार्डी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक ही पहिल्यांदाच जनतेतून होत आहे*.
*या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण एस .सी. (अनुसूचित जाती जमाती )असे असून दहा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या बार्डी च्या अठराशे मतदान आहे*.