*तरीही खाजगी सावकारकी थांबण्याचे नाव घेत नाही* *पंढरीतील श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी संस्थेच्या उद्घाटन समारंभात वैचारिक घुसळण* *राजकारण बाजूला ठेऊन ,नागेश फाटे यांच्या निमंत्रणाचा तालुक्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी स्वीकार करीत कार्यक्रमाला हजेरी*

*तरीही खाजगी सावकारकी थांबण्याचे नाव घेत नाही*  *पंढरीतील श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी संस्थेच्या उद्घाटन समारंभात वैचारिक घुसळण*  *राजकारण बाजूला ठेऊन ,नागेश फाटे यांच्या निमंत्रणाचा तालुक्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी स्वीकार करीत कार्यक्रमाला हजेरी*

पंढरपूर /प्रतिनिधी

समाजातील खाजगी सावकाराची पद्धत अद्यापही सुरूच आहे. सहकाराचे जाळे कितीही मोठे झाले, यात निधी बँकांचीही भर पडली, तरीही खाजगी सावकारकी बिनबोभाट सुरू आहे. राष्ट्रवादीच्या व्यापारी आणि उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी उभारलेल्या श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी संस्थेच्या माध्यमातून गरजूंना मदत होईल, असा विश्वास यावेळी मा.आमदार प्रशांत परिचारक, धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे, यांच्यासह अभिजीत पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके आदी मान्यवरांनी व्यक्त केला.


पंढरपूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी या संस्थेचा शुभारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर मंगळवारी मोठ्या थाटात पार पडला. वरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते फीत कापून हा उद्घाटन समारंभ पार पडला.प्रारंभी या संस्थेचे चेअरमन नागेश फाटे यांनी ही संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश सांगितला. यानंतर सहकारात कसलेल्या सर्वच दिग्गज मंडळींच्या चर्चेतून एकच विषय पुढे आला तो म्हणजे खाजगी सावकारकी न संपण्याचा.

मा.आ. प्रशांत परिचारक यांनी आर्थिक गरजा असणारे अनेक नागरिक समाजात आहेत. काही नागरिकांना सकाळी पैसा हवा असतो, संध्याकाळी तो पैसा माघारी करतात. समाजात आर्थिक सुबत्ता आली आहे. आर्थिक चळवळ मोठी झाली आहे. तरीही गावागावात आणि शहरातही खाजगी सावकारकी बोकाळली आहे, याबाबत आजही खेद वाटतो असे वक्तव्य केले.


धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे सर यांनी, संस्था कशी चालवायची ? दोन हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणारी संस्था चालवताना, एखादा निर्णय चुकतो की काय ? याबाबत मलाही भीती वाटते. कर्ज मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीला नाराज करून चालत नाही, त्याचा अभ्यास करून कर्ज द्यावे लागते. राज्यात मोठे सहकाराचे जाळे निर्माण झाले आहे, तरीही नागरिक खाजगी सावकारांकडे जातात, त्यांच्या पाशात अडकतातच. विठ्ठल निधीकडून अधिकाधिक नागरिकांना मदत होवो, अशी प्रार्थना शिवाजीराव काळुंगे सर यांनी केली. यावेळी शोभाताई काळुंगे यांनीही आपले मौलिक विचार मांडले.


याप्रसंगी सरकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, सु.रा. परिचारक पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शोभाताई काळुंगे, भगीरथ भालके आदींनीही आपली मनोगते व्यक्त करून, नागेश फाटे यांना, संस्थेबाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी करसल्लागार
राशीनकर यांनी निधी बँकेच्या संकल्पनेबाबतची माहिती उपस्थित नागरिकांना दिली.

याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर कसंगावडे, देवानंद गुंड पाटील, सहकार शिरोमणीचे व्हाईस चेअरमन राजेंद्र शिंदे, पंढरपूर नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, महादेव देठे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष विष्णू यलमार, नितीन शेळके, कर सल्लागार अनिकेत देशपांडे प्रदीप राशिनकर रमेश तरटे आदींसह संदीप गाजरे, उद्धव बागल, हनुमंत मोरे, संतोष बाबर यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री कल्याण कुसुंमडे, गोरख बागल, उमेश फाटे, शुभम फाटे, उमेश सासवडकर, शांतिनाथ बागल, आण्‍णासो फाटे, शशिकांत माने, ओंकार फाटे आदी मंडळींनी परिश्रम घेतले.


चौकट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यापार आणि उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्षपद घेतल्यापासून, राज्यात ठीकठिकाणी दौरे झाले. ठिकठिकाणच्या उद्योजकांशी संपर्क आला. आर्थिक अडचणी जाणून घेतल्या. यातून काहीतरी मार्ग काढावा, या उद्देशाने श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सक्षम उद्योजकांच्या ठेवी आणि गरजू उद्योजकांना कर्ज या संस्थेमार्फत देण्याचा प्रयत्न होणार असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे चेअरमन नागेश फाटे यांनी दिली.