*राष्ट्रवादी उद्योग व व्यापारी सेलचा कार्यहवाल राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्याकडे सादर**प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या संघटनवाढीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खूष*

*राष्ट्रवादी उद्योग व व्यापारी सेलचा कार्यहवाल राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्याकडे सादर**प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या संघटनवाढीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खूष*

पंढरपूर/ प्रतिनिधी -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील   यांची पुणे येथे भेट घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाचा  कार्य अहवाल  प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सोलापूर सादर केला आहे. यावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेमंडळींनी राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार सेलच्या या सुरू असलेल्या संघटन बांधणीचे विशेष कौतुक केले आहे.
  हा कार्य अहवाल सादर करताना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे , विठठल सह.साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन लक्ष्मणआबा पवार, सुतगिरणीचे चेअरमन तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर पाटील, विलास देठे, पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, पंढरपूर ता . राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याण कुसमडे उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी खानदेश, विदर्भ,उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विभागाचा दौरा करुन जिल्हानिहाय  पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन अडी अडचणी जाणुन घेतल्या त्यांचा कार्य अहवाल आज सादर केला.
पंढरपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार यांच्या करीता पंढरपूर तालुक्यामध्ये एम.आय.डी.सी.स्थापन करणेबाबत संबंधीत विभागाकडे पाठपुरावा केला. याकडेही राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले असल्याचेही नागेश फाटे यांनी सांगितले