*आ.अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याने.३० वर्षांचा पाणीप्रश्न अवघ्या ८ दिवसांत लागला मार्गी* *गावोगावचे नेते फोडत बसण्यापेक्षा थेट जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदारकडून दिला जातोय भर*
पंढरपूर/ प्रतिनिधी
माढा -पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची तयारी आतापासून सुरू आहे. काहीजण आमदार होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांमधून विशेषता गावोगावचे मोठे नेते जवळ घेऊन आपल्या पाठीमागे गाव असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र खुद्द विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांनी मात्र थेट जनतेच्या विकास कामांना प्राधान्य देण्याचे काम आजवर सुरू केले आहे. त्यामुळे गावोगावच्या नेत्यापेक्षा आपली जनताच भारी असा फंडा आमदार अभिजीत पाटील यांनी सुरू ठेवला आहे.
जाधववाडी-मोडनिंब येथील गावठाण तलाव भरून संपूर्ण गावाला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामस्थ गेल्या ३० वर्षांपासून संघर्ष करत होते. अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न अखेर आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे.
काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी आमदार अभिजीत आबा पाटील यांच्याकडे पाईपलाईनची मागणी केली. ग्रामस्थांची मागणी ऐकून घेत आमदारांनी तातडीने पाठपुरावा केला आणि अवघ्या आठ दिवसांत पाईपलाईन जाधववाडीपर्यंत पोहोचवून दिली.
या पाईपलाईनमुळे गावठाण तलावात पाणी आणणे शक्य होणार असून, जाधववाडी तसेच परिसरातील आजूबाजूच्या गावांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे गेल्या तीन दशकांपासून पाण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला आता प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून दिशा मिळाली आहे.
ग्रामस्थांची मागणी, आमदारांचा तातडीचा पाठपुरावा आणि अवघ्या आठ दिवसांत प्रत्यक्ष पाईपलाईन — हा विकासकामातील गतिमान कार्यपद्धतीचा प्रत्यय आहे
या पाईपलाईनचे आज ज्येष्ठ नेते भारत आबा शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी बाबुतात्या सुर्वे, पंचायत समिती सदस्य बालाजी पाटील, कुरण गिड्डे, शिवाजी सुर्वे, नितीन गडधरे, संतोष दळवी,प्रवीण माने, विठ्ठल मोरे, सौदागर जाधव, राजकुमार जाधव, अभिजीत जाधव,उदय जाधव, संतोष मुटकुळे, संभाजी काळे, अख्तर तांबोळी, निलेश काळे, महादेव मोरे, अरुण सोमासे, नंदकुमार लादे, बाळासाहेब सोमासे, गंगाधर जाधव, माने महाराज, अंकुश जाधव, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जाधववाडीच्या पाणीप्रश्नासाठी तातडीने पुढाकार घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार अभिजीत आबा पाटील यांचे आभार मानले.