*पुणे येथील मंगळवेढा रहिवाशी संघाच्या वतीने आ. समाधान आवताडे यांचा सन्मान* *पुणे येथील रावेत परिसरात केला सत्कार*

*पुणे येथील मंगळवेढा रहिवाशी संघाच्या वतीने आ. समाधान आवताडे यांचा सन्मान*  *पुणे येथील रावेत परिसरात केला सत्कार*

पंढरपूर:-प्रतिनिधी 
  मंगळवेढा येथील रहिवाशी आणि पुणे येथील वास्तव्यास असलेल्या लोकांनी एकत्रितपणे येऊन आपल्या भूमीपुत्राचा  सत्कार म्हणून आ. समाधान आवताडे यांचा सन्मान करण्यात आला.
     पुणे येथील रावेत परिसरात या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, भोसरीचे आ महेशदादा लांडगे, चिंचवडचे आ. लक्ष्मण जगताप, माजी आमदार जगदीशभाऊ मुळीक, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे, भाजप पिंपरी चिंचवडचे शहर उपाध्यक्ष नवनाथ ढवळे, उद्योजक दीपक भोंडवे, म्हातुशेठ वाकडकर, सुरेश येलपले, प्रसाद बोराडे, देवा पवार, भाजपचे चिटणीस अमित बोरके, जेष्ठ नेते येताळ भगत, दामाजी शुगरचे संचालक राजेंद्रबापू सुरवसे, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोजभाई काझी, युवा नेते विराजदादा आवताडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी मंगळवेढा रहिवाशी संघ पुणे येथील संस्थापक अध्यक्ष आझादभाई पटेल (दारुवाले)यांनी उपस्थित मान्यवर मंडळींचे आभार मानले.