*राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभाग पक्षवाढीसाठी वेगळी ओळख करून दाखवेल* ! *सौ.रुपालीताई चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेटीप्रसंगी दिला विस्वास* *रुपालीताई चाकणकर यांनी पक्ष संघटना वाढीविषयी विविध मुद्दयावरती केली चर्चा*.

पंढरपूर/प्रतिनिधी
राज्य माहिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांनी पंढरपूर दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेश आध्यक्ष मा.श्री.नागेश फाटे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान रुपालीताई चाकणकर यांनी पक्ष संघटना वाढीविषयी विविध मुद्दयावरती चर्चा केली.
यावेळी प्रत्येक जिल्हाध्यक्ष आणि तालुका पदाधिकाऱ्यांशी संपर्क ठेऊन शहर-गाव पातळीवरील बुथ बांधनी करून, सक्रिय आणि निष्टावंत कार्यकर्त्यासोबत संपर्क ठेवण्याचा सल्ला नागेश फाटे यांना दिला. विविध प्रकारचे उद्योग व व्यापार विभागाचे मेळावे भरवुन त्यांच्या समस्या समजुन घेऊन त्या सोडवण्यावरती भर देण्याचा सल्लाही दिला.प्रत्येक महिन्याला शक्य असेल तर व्हीडिओ काँन्फरंन्सद्वारे पदाधिकाऱ्याशी संवाद साधत त्यांच्या कार्याची माहीती घेण्याचा सल्ला यावेळी चाकणकर यांनीदिला.
.श्री नागेश फाटे हे करत असलेल्या कामाचं कौतुक करत या विभागाला आपल्या कार्यातून नक्कीच वेगळी ओळख निर्माण होईल आशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य जयश्री ताई काळे-पालवे,सौ.साधना लोखंडे गादेगावचे उपसरपंच गणपत मोरे, विक्रम बागल, अण्णा मोलाणे, सतीश बागल, डॉ. रमेश फाटे, प्रताप पवार, ओंकार फाटे, निवृत्ती पाटील, विकास घाडगे, विनय शिंदे, सोमनाथ सातपुते, अफसर मुल्ला, संदीप राय, श्रीयश जगताप आदी उपस्थित होते.