त्या मगरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियाच्या सांत्वनपर भेटीच्या वेळी आ. आवताडे आणि आ परिचारक यांचेकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत*

त्या मगरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियाच्या सांत्वनपर भेटीच्या वेळी आ. आवताडे आणि आ  परिचारक यांचेकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत*

पंढरपूर/प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला आणि वारंवार वीज तोडणीला कंटाळून बटईच्या शेतातील उभे पीक करपत असल्याचे बघवत नसल्याच्या कारणास्तव पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील युवा शेतकरी कै. सुरज रामा जाधव यांनी विष प्राशन करून फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली.

महाविकास आघाडी व महावितरण यांच्या तुघलकी धोरणांना कंटाळून जीवनाचा शेवट करणाऱ्या कै. सुरज जाधव परिवाराची पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे जनसेवक आमदार मा. समाधान दादा आवताडे व जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक  यांनी सांत्वनपर भेट घेऊन त्यांना एक लाख रुपये आर्थिक साहाय्य मदत करून मानसिक आधार दिला.
  यावेळी आमदार आवताडे साहेब यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शी फोन वरून मयत सूरज जाधव यांचे वडिलांशी चर्चा घडवून आणली. यावेळी सरकारला धारेवर धरत चालू अधिवेशनामद्ये आवाज उठवून नक्कीच  न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

भारतासारख्या कृषीप्रधान देशात परत शेतकऱ्याच्या जन्माला येणार नाही अशी भावनिक साद घालत अखेरचा श्वास घेणाऱ्या या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्यने शेतकरी जातीला खूप मोठी संवेदना आणि ठेच पोहचवली आहे.

सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या तोंडाला नेहमीच आश्वासनांची पाने पुसणाऱ्या या सरकारच्या धोरणात्मक बाबींचा आमदार महोदय यांनी तीव्र शब्दात निषेध करून कै. सुरज जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली.
  यावेळी श्री. दिलीप आप्पा घाडगे,दिलीप चव्हाण,माऊली हळणकर, भास्कर कसगावडे,सुभाष मस्के,विनोदराज लटके,शरद चव्हाण सर, अविनाश मोरे,बालम मुलाणी,व मगरवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ आणि सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.