*इंटरनेटच्या युगात.... कर्णबधिर माणिकला रेडिओची साथ..*...!

*इंटरनेटच्या युगात.... कर्णबधिर माणिकला रेडिओची साथ..*...!


करकंब /प्रतिनिधी

: आज जग इंटरनेटच्या युगात इतक्या प्रचंड वेगाने पुढे गेले आहे. त्यामुळे जी पूर्वी आपण रेडिओ टेलिव्हिजन माध्यम कालबाह्य झाली की काय असे असताना मात्र या जगात असेही काही अवलिया असतात की जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे आपल्या जीवापाड मुलावर प्रेम करणारे त्याच पद्धतीने आपला छंद जोपासण्याचे आजच्या युगात हे चित्र दिसून येत आहे. बालपण असो तरुणपण असो किंवा वृद्धपणा ज्यांनी पूर्वीच्या काळात इंटरनेटच्या युगाच्या आधी  या माध्यमाची जोपासना करून त्यातच टेलिव्हीजन असो त्याचाही छंद जोपासण्याचा प्रयत्न केला. अशाच सध्याच्या इंटरनेटच्या युगात अगदी आपले कळते पणापासून रेडिओ अर्थात आकाशवाणी केंद्र आपल्या हातातून कधीच न सोडलेला करकंब येथील रेडिओ मास्टर कर्णबधिर असलेला माणिक मोहिकर आजही विशेषता रेडिओ वरील बातम्या विशेषता जुनी सुमधुर गाणी मोठ्या आवाजाने अगदी घरापासून गावात फिरत फिरत ऐकण्याची छंद जोपासतात. त्याच्या या आवडीला लोक कंटाळत नाही याउलट या रेडिओ च्या आकाशवाणी केंद्रावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या कानावर आजही आकाशवाणी केंद्रावरील बातमी सुमधुर गाणी इतर माहिती या माध्यमातून जाताजाता समजते .म्हणून तर आजच्या या इंटरनेटच्या युगात, माणिक मोहिकर यांना करकंब चा रेडिओ मास्टर म्हणतात.
 करकंब ता पंढरपूर येथील सोमवार पेठ स्टेट बँके लगत वास्तव्य करत असलेल्या या अत्यंत प्रतिकूल गरीब परिस्थितीत असलेल्या कर्णबधिर माणिक मोहिकर याला पूर्वीपासूनच हा रेडिओ चा छंद कळते पणापासून सायकलवर पाण्याच्या घागरी हॉटेलमध्ये पाणी देणे आणि त्या विक्रीतून आलेले रकमेतून आपल्या कुटुंबाची उपजीविका करत इंटरनेटच्या धावत्या युगात कर्णबधिर माणिक मोहिकर याला रेडिओ ची साथ आहे . तरी तो हा छंद आजही जोपासत आहे.