*निश्चित ध्येय आणि आत्मज्योत भेटल्याशिवाय यशाची शिखरे पार करता येत नाही.आ शहाजीबापू* *वाडीकुरोली येथे कल्याणराव काळे व्यापारी संकुलाचे उद्घाटन व रायझिंग स्टार पब्लिक स्कूलचा भूमिपूजन समारंभ संपन्न*

*निश्चित ध्येय आणि आत्मज्योत भेटल्याशिवाय यशाची शिखरे पार करता येत नाही.आ शहाजीबापू*  *वाडीकुरोली येथे कल्याणराव काळे व्यापारी संकुलाचे उद्घाटन व रायझिंग स्टार पब्लिक स्कूलचा भूमिपूजन समारंभ संपन्न*

पंढरपूर /प्रतिनिधी 
 जीवन हे ध्येयवादी असावे विद्यार्थ्यांनी ध्येयाने झपाटून जाऊन आत्मज्योत पेटल्याशिवाय यशाची शिखरे पार करता येत नाही असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू  पाटील यांनी केले, ते श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडीकुरोली यांनी उभारलेल्या कल्याणराव काळे व्यापारी संकुलाचे उद्घाटन व रायझिंग स्टार पब्लिक स्कूल  च्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी  वाडीकुरोली येथे बोलत होते .
यावेळी आमदार यशवंत माने संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे विठ्ठलचे संचालक महादेव देठे  समाधान काळे यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे माजी संचालक  संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कौलगे  सचिव बाळासाहेब काळे संचालक दिनकर चव्हाण, चंद्रकांत पाटील, रावसाहेब देशमुख, महादेव नाईकनवरे, कांतीलाल काळे, शामराव देठे  संचालक  मोहन  नागटीळक हणमंत सुरवसे  व बहुसंख्य पालक  उपस्थित होते .
यावेळी पुढे बोलताना आमदार शहाजी पाटील म्हणाले की जीवनात एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे महत्त्वाचे असून  विद्यार्थीदशेतच ऊर्जा क्षमता आणि ध्येय निश्चित करून आपली पुढील वाटचाल निश्चित करता आली पाहिजे  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार  यशवंत  माने म्हणाले की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम असेल तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची कमान उभी राहते त्यासाठी सुरू केलेल्या रायझिंग पब्लिक स्कूल च्या माध्यमातून या भागातील विद्यार्थ्यांना नर्सरी पासून दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध  होणार असून भविष्यात उज्वल पिढी तयार होण्याचा पाया भक्कम होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी केले यावेळी त्यांनी सांगितले की सर्व सोयी सुविधा युक्त शैक्षणिक संकुलाची उभारणी होऊन ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा देणे  हे सहकार शिरोमणी वसंतराव  दादांचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्यासाठी कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शैक्षणिक संकुल प्रयत्न  करत आहे . कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन  संजय कुलकर्णी व प्रा. समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य दादासो खरात यांनी मानले
चौकट . खेलो  इंडिया स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये वाडीकुरोली येथील वसंतराव काळे प्रशाला संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजयी होऊन देखील एकाही खेळाडूची  महाराष्ट्राच्या संघात निवड झालेली नाही त्यामुळे ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूवर अन्याय झाला आहे याची गांभीर्याने दखल घेऊन क्रीडा मंत्री सुनील केदार  राज्यमंत्रीआदिती तटकरे  यांच्याशी लवकरच बैठक लावून योग्य न्याय देण्याची भूमिका घेतली जाईल असे अभिवचन आमदार यशवंत माने व  शहाजीबापू  पाटील यांनी दिले.